घरमुंबईलोकल फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न, पुन्हा लॉकडाऊन होणार? वडेट्टीवार यांचे मोठे वक्तव्य

लोकल फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न, पुन्हा लॉकडाऊन होणार? वडेट्टीवार यांचे मोठे वक्तव्य

Subscribe

सिनेमागृह बंद करण्याचाही विचार सुरु

मुंबईत मागील महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरु आहेत. तसेच पुन्हा लॉकडाऊन केल्यास जनतेला परवडणारं नाही. अनेक लोकांना नाहक त्रास होईल परंतु वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. असे वक्तव्य करत महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊ होण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला आहे. त्यामुळे सरकार विचारपूर्वक निर्णय घेत आहे. कोरोनामुळेच अधिवेशनाचे कामकाजही ८ दिवसांचे केले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु आहे. लोकलमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होते तसेच नियमांचे उल्लंघन होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Corona संक्रमित देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर


विदर्भात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील ४ जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर, लग्न समारंभांवर ही लक्ष ठेवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिनेमागृहे बंद करण्याचा विचारही सुरु असल्याचे मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -