Eco friendly bappa Competition
घर मुंबई कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या उत्साहातच वज्रमुठ सभा होईल - अनिल परब

कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या उत्साहातच वज्रमुठ सभा होईल – अनिल परब

Subscribe

मुंबई : येत्या 1 मे रोजी महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमूठ सभेचे (Vajramuth Sabha आयोजन करण्यात आले असून ही सभा यशस्वी पार पडावी यासाठी मुंबईत तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी कामगार दिन (Labor Day) आणि महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात (Maharashtra Day) वज्रमूठ सभा होईल, असे वक्तव्य केले आहे.

1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वज्रमूठ सभेचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. सभा यशस्वी करण्यासाठी जे नियोजन करावे लागते त्यासाठी मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सभेच्या पूर्व तयारीसाठी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख जबाबदार पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, मुंबई प्रदेशचे भाई जगताप यांनी मार्गदर्शन केले आहे. खारमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेनंतर सर्वच पक्षांनी खबरदारीचे घेण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

गेलया काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्यामुळे तापमान 40 च्या पुढे गेले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सभेचे आयोजन करणे हे उदिष्ट नसून ही सभा कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही अशाप्रकारे आयोजित करायची आहे, असे अनिल परब म्हणाले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी, लोकांनी सभेला यावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेची रुपरेषा जवळपास नक्की झाली आहे. पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली असून त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. सगळ्या परवानग्या घेण्यासाठी आम्ही अर्ज केले आहेत, त्यानुसार काही परवानग्या मिळाल्या आहेत, तर काही मिळायच्या बाकी आहेत. पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी कुठेकुठे पार्किंगची व्यवस्था होऊ शकते आणि लोक कुठल्या दिशेने येतील त्या दिशेला पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व विषयांवर मार्गदर्शन या बैठकीत झाले आहे. त्यामुळे सभेला कुठलीही अडचण येणार नाही आणि लोकांना जाणे-येणे सोयीचे जाईल. सभेच्या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्याप्रमाणे महाविकास आाघाडीची सभाही मोठ्या उत्साहात पार पडेल, असा विश्वास आजच्या बैठकीत आम्ही व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -