Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Valentine Day Special : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येताच, नेटिझन्सनं केलं...

Valentine Day Special : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येताच, नेटिझन्सनं केलं ट्रोल

अनेकांनी या नव्या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Related Story

- Advertisement -

व्हॅलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीस यांनी नवीन गाणं रिलीज केलं. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यामुळे, फॅशनमुळे आणि राजकीय टीकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी रिलीज झालेल्या गाण्यामुळे नेटिझन्सच्या चर्चेला उधाण आलं आहे. ‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे. (Valentine’s Day Special: Amrita Fadnavis new song) 24 तासांत हा नवीन व्हिडिओ 47 हजार 513 जणांनी पाहिला असून, अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या नवीन गाण्याचे दिग्दर्शन दिग्दर्शक आशिष पांडा यांनी केलं.

‘या’ गाण्याला मिळाले यूट्युबवर लाखो हिटस्

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या या नवीन गाण्याच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य केलं होतं. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेलं ‘तिला जगू द्या’ हे गाणं तेव्हा चांगलंच चर्चेचा विषय ठरलं होतं. तसेच ‘तिला जगू द्या’ या गाण्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यात आला होता. या गाण्याला यूट्युबवर लाखो हिटस् मिळाले होते.

अमृता फडणवीस यांच्या गाण्याची उडवली खिल्ली

दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्या गाण्याची खिल्ली उडवली होती. आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? असा सवाल त्यांनी अमृता फडणवीस यांना केला होता.

अमृता फडणवीस यांची काही रिलीज झालेली गाणी

- Advertisement -

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केलं होतं. गेल्या महिन्यात अमृता फडणवीस यांनी ‘झी म्यूझिक मराठी’च्या ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. ”डाव मांडते भीती”, असे गाण्याचं शीर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या होत्या. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला होता.


हेही वाचा – रिंकू शर्मा प्रकरणात कंगनाने साधला अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

- Advertisement -