खुशखबर! CSMT वर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची एन्ट्री; रचला ‘हा’ इतिहास

vande bharat express arrives at chatrapati shivaji maharaj terminus

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अखेर हायस्पीड ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची एन्ट्री झाली आहे. या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईत दाखल होताच एक नाव इतिहास रचला आहे. इतिहासात पहिल्यांदाच या ट्रेनने कोणत्याही प्रकारच्या बँकर इंजिनशिवाय लोणावळा ते खंडाळा येथील भोर घाट उतरला आहे. यामुळे आगामी काळात वंदे भारत ट्रेन कसारामधील थल घाट आणि लोणावळामधील भोर घाट कोणत्याही बँकर इंजिन न लावता चालवल्या जाणार आहेत. या अत्याधुनिक ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहे, यामुळे या ट्रेन चढ आणि उतारावर अपघातग्रस्त होणार नाहीत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी भारताची सर्वात अत्याधुनिक आणि पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्प्रेस दाखल झाली. घाट विभागात वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेतली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. यासाठी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाली आहे. या दोन वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आता महाराष्ट्रातील अतिशय महत्वाची तीर्थस्थळं असलेल्या शिर्डी आणि पंढरपूरमध्ये एकाच दिवशी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा मुंबईला येणं शक्य होणार आहे.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा वेळ

सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीसाठी रोज सकाळी 6.15 वाजता ट्रेन सुटणार आहे. तिथे ही दुपारी ट्रेन 12.10 ला पोहोचेल. यानंतर परत शिर्डी संध्याकाळी 5.25 वाजता ही ट्रेन सुटेल आणि मुंबईला रात्री 11.18 ला पोहचेल. तर सोलापूरला जाणारी ही ट्रेन सीएसएमटीवरून सकाळी 6.5 मिनिटांनी सुटणार आहे. तर सोलापूरला दुपारी 12.35 वाजता पोहचेल. तर सोलापूरमधून संध्याकाळी 4.10 वाजता ही ट्रेन सुटणार आहे, आणि ती मुंबईला रात्री 10.40 वाजता पोहोचेल.


नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय