घरमुंबईPM मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

PM मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ( 10 फेब्रुवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहे. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार असून काही विकास प्रकल्पांचे उद्धाटन केलं जाईल. यासह मोदींच्या हस्ते दाऊजदी बोहरा समुदायाच्या कॅम्पसचं देखील उद्धाटन होणार आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. मोदींचा हा मुंबई दौरा सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केली आहे. मात्र या दौऱ्यामुळे मुंबईत काही ठिकाणी वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधेरी मरोळमधील वाहतूक काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल नेमके कसे आहेत, आणि चालकांना वाहतूक कोंडीत न अडकण्यासाठी कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करावा हे जाणून घेऊ…

PM MODI MUMBAI TOUR

- Advertisement -

मुंबई वाहतूक पोलीस अप्पर आयुक्त निसार तांबोळी यांनी मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतील बदलासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे.

या परिपत्रकानुसार, अल्जामिया- तस- सैफियाच्या नवीन कॅम्पस उद्धाटनानिमित्त मुंबईतील अंधेरी पूर्व मरोळ कॅम्पस येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कार्यक्रमास्थळी जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण मरोळ चर्च रोड (आणि मरोळ चर्च रोडच्या बाजूचे रस्ते), एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन जंक्शन, अंधेरी घाटकोपर कुर्ला रोड आणि विलेपार्ले (पूर्व) पासून एलिव्हेटेड एअरपोर्ट रोडवरील वाहतूक नियंत्रित आणि नियमन केले जाईल.

- Advertisement -

वाहतुकीचे नियमन करताना 10 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 6.30 वाजल्यापर्यंत या रस्त्यांवरील प्रवाशांसाठी खालील पर्यायी मार्ग उपलब्ध होतील.

चालकांनो ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर 

(१) अंधेरी घाटकोपर कुर्ला रोड दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक ही साकीनाका जंक्शन येथून मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून साकी विहार रोडने मिलिंद नगर एल. अॅन्ड टी. गेट नं. ८ येथून डावे वळण घेऊन जे. व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ होतील.

(२) बोहरा कॉलनी कडून मरोळ चर्च मार्गे अंधेरी कुर्ला रोडकडे जाणारी वाहतूक कदमवाडी मधुम मरोळ पाईपलाईन या अंतर्गत मार्गाने अंधेरी कुर्ला रोड कडे मार्गस्थ होतील.

(३) बोहरा कॉलनी कडून मरोळ चर्च रोड मार्गे मरोळ मरोशी रोडकडे जाणारी वाहतूक ही स्टार पोल्टी फार्म मरोळ चर्च रोड येथे डावे वळण घेउन अंतर्गत मरोळ गाव मार्गाने सरळ जाऊन सावला जनरल स्टोअर जवळ डावे वळण घेऊन मरोळ मरोशी रोडकडे मार्गस्थ होतील.


हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या वेळापत्रक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -