घरCORONA UPDATEलॉकडाऊनमध्ये त्याने शोधला वेगळा मार्ग; टाकाऊ पासून टिकाऊतून कमवले पैसे

लॉकडाऊनमध्ये त्याने शोधला वेगळा मार्ग; टाकाऊ पासून टिकाऊतून कमवले पैसे

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेला असला तरी उमेद हरू नका...

तसा तो फिल्म इंड्रस्टीवाला रंगभूषाकार. पण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच फटका त्यालाही बसला. घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यालाही पडला होता. परंतु यातून हार न मानता त्याने उपजीविकेचा वेगळा मार्ग शोधला असून त्याला जवळचे मित्र आणि समाजातील इतर लोकांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. आज रुपेश प्रकाश पंडित या तरुणाने आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रतिभेने तरुणांपुढे वेगळा आदर्श उभा केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गेले ३ ते ४ महिने लॉकडाऊनच्या काळात घरी बसावे लागल्यामुळे अनेकांची मानसिक आणि आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवावे हा प्रश्न सर्वांसमोर सेकंदाच्या काट्यासारखा फिरत आहे. रुपेश पंडित फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून रंगभूषाकार म्हणून काम करतोय. गेल्या तीन महिन्यापासून काम बंद आणि पुढ कधी सुरू होईल, याची शाश्वती नाही. हे लक्षात घेऊन रुपेशने घरातील टाकाऊ गोष्टींपासून टिकावू वस्तू तयार करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

घरात आपल्या आठवणीसाठी जपून ठेवलेल्या जुन्या वस्तू कोणी फेकून दिल्या असतील तर कोणी आठवण म्हणून ठेवून दिल्या असतील. तर त्या वस्तुंना एक नवीन रूप देण्याचे काम रुपेश करत आहे. त्याची सुरुवात त्याने आपल्या घरातूनच केली. यासाठी त्याने घरातील जुन्या बाटल्या, जुना स्टूल, मोबाईलचे बॉक्स, झाडाचे खोड, जुने प्लास्टिकचे डबे वगैरे यातून आपल्या कलाकृती तयार केल्या आहेत. ज्या शोभिवंत वस्तू तुम्ही मॉलमधून किंवा शॉपमधून विकत घेता, त्यापेक्षा कमी दरात तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणीतली वस्तू तुमच्याच नजरेत परत नव्या रूपात आणून दिली तर? ज्या वस्तूला तुम्ही निकामी म्हणून पाहिले असेल ती एका आगळ्या-वेगळ्या रुपात तुमच्या समोर आल्या तर? हेच काम रुपेश करत आहे आणि आता त्याला त्याचे मित्र आणि समाजातील काही लोक मदत करत आहेत. त्यातून त्याला पैसेही मिळू लागले आहेत. त्याने नैराश्य झटकून तरुणांना सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले असून एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

तुमच्या आतमध्ये लपलेली कला बाहेर काढा. घरात बसून पुढे कसं होईल याचा विचार न करता स्वतःमध्ये काय कला दडून बसली आहे. त्याला बाहेर कसे काढायचे याचा विचार करा. तुमचेे त्यात मन रमेल. नकारात्मक विचार दूर राहतील.
– रुपेश प्रकाश पंडित, रंगभूषाकार

- Advertisement -
Rupesh pandit ph 1
कलाकार रुपेश पंडीत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -