घरमुंबईवझे केळकर कॉलेजला स्वायत्त दर्जा

वझे केळकर कॉलेजला स्वायत्त दर्जा

Subscribe

मुंबईतील स्वायत्त कॉलेजांच्या यादीत आता आणखीन एका नव्या कॉलेजांची भर पडली आहे. पूर्व उपनगरातील नामांकित वझे केळकर महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाले आहे. केळकर महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे मुंबईतील स्वायत्त कॉलेजांच्या आकडा आता १३ वर पोहचला आहे. महाविद्यालयातर्फे नुकताच त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबईचे मुख्य पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

स्वायत्त दर्जा प्राप्त झालेल्या या विशेष कार्यक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाचे आजी सभासद डॉ. गोपाळ रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव एम. आर. कुरुप व संस्थेच्या विश्वस्त ज्योती भडकमकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा व उप प्राचार्या सुष्मिता डे, उपप्राचार्य सी.ए. विद्याधर जोशी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ज्योती भडकमकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुणे संजय बर्वे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नविन नामफलकाचे अनावरण करण्यात आले तसेच डॉ. गोपाळ रेड्डी यांनी महाविद्यालयाचे नविन माहिती पत्रक प्रदर्शित केले.

- Advertisement -

या कार्यक्रमात बोलताना प्राचार्यांनी महाविद्यालयाने आतापर्यंत गाठलेल्या यशाच्या पायर्‍यांची माहिती दिली व स्वायत्तता मिळाल्यामुळे महाविद्यालय आणखीन यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे सचिव एम. आर. कुरुप यांनी स्वायत्तता मिळवण्यापर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील आव्हानं यावर त्यांच मत व्यक्त केल. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना स्वायत्तता मिळणे कसे आवश्यक आहे याबद्दल डॉ. गोपाळ रेड्डी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे संजय बर्वे यांनी विद्यार्थ्यांना असलेली विविध प्रलोभने व समाज माध्यमांचे दुष्परिणाम, शिक्षणामुळे मिळणारे राष्ट्रीय चारित्र्य याबद्दल सांगताना “तरुण पिढीला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळाल्यास ती उच्च कामगिरी करू शकेल” अशा शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाच्या उप प्राचार्या मा. सुष्मिता डे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -