Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चार कोटी ९८ लाखांचा खाद्यतेल साठा जप्त

चार कोटी ९८ लाखांचा खाद्यतेल साठा जप्त

Related Story

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबईसह पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स आणि घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळून एकूण 4,98,74,973 रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 93 खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत. या धाडीत एकूण 30 अन्न सुरक्षा अधिकारी सहभागी झाले होते. राज्यातील जनतेच्या आरोग्याची प्रथम जबाबदारी लक्षात घेऊन, त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त माहितीच्या आधारे धाडी टाकल्या जातात.

राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील धाडीचा अन्य हेतू असतो. 16 जानेवारी, २०२१ शनिवार रोजी अशाच नियोजनाचा भाग म्हणून मुंबई आणि ठाणे परिसरातील काही खाद्यतेल व्यवसायांवर धाडी घालण्यात आल्या.

- Advertisement -

या धाडीत मुंबई परिसरातील मे. आयता एन्टरप्रायजेस प्रा.लि., बोरीवली (पश्चिम), मुंबई, मे. अष्टमंगल ऑईल मार्केटिंग प्रा.लि.,गोरेगाव (पश्चिम), मुंबई 86 व ठाणे परिसरातील मे. सदानंद ऑईल ट्रेडर्स, वसई, जि. ठाणे, मे. गौतम एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, मे. शिवशक्ती एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, मे. गॅलक्सी एन्टरप्रायजेस, काल्हेर, ता. भिवंडी, मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर आणि मे. आशिर्वाद ऑईल डेपो, मिरा रोड, जि. ठाणे या आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी एकूण 4,98,74,973/रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला. 93 खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.

धाडीचा परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर या पेढीतून घेण्यात आलेल्या 14 पैकी 14 नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. तसेच घेण्यात आलेल्या एकूण 93 खाद्यतेलाच्या नमुन्यांपैकी अप्रमाणित दर्जाचे 49 नमुने आढळून आले आणि 44 नमुने प्रमाणित दर्जाचे आढळून आले.

- Advertisement -

ही कारवाई शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई विभाग, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रमाणित आढळलेल्या खाद्यतेलाचा जप्त साठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे आणि अप्रमाणित नमुन्याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत. या धाडीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागामध्ये खाद्य तेलाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश सर्व सह आयुक्तांना देण्यात आले असून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -