घरCORONA UPDATEनवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

Subscribe

वाशीचे एपीएमसी मार्केट येत्या १५ एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्यात आले होते. मसाला मार्केटमधील एका व्यापार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्यानंतर कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटमधील व्यापार्‍यांनी गुरुवारी एका बैठकीत तीनही बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता भाजी आणि कांदा, बटाटा मार्केट येत्या १५ एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

…यामुळे सुरु करण्यात आले मार्केट

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरता देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन उद्या, १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. परंतु, नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळावी याकरता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशी बाजार समितीने भाजीपाला आणि कांदे, बटाटा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याचबरोबर धान्य बाजार सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisement -

भाजीपाला मागवणाऱ्यांना आवाहन

‘धर्मवीर संभाजी महाराज भाजीपाला व्यापारी संकुल (वाशी भाजीपाला मार्केट) बुधवारपासून चालू करत आहोत. ज्या कोणाला माल मागवायचा असेल, त्यांनी बाजार समितीच्या विभाग कार्यालयात येणाऱ्या मालाची माहिती एक दिवस अगोदर आपल्या लेटरपॅडवर गाडी नंबरसह देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे जे व्यापारी सदरची माहिती बाजार समितीला देतील त्याच व्यापाऱ्यांच्या मालाच्या गाड्यांना बाजार आवारात प्रवेश दिला जाईल’, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: धक्कादायक! पालिकेचे अन्नपाकिटे लोकांपर्यंत जाण्यापूर्वीच खराब!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -