घरमुंबईपावसामुळे महागल्या भाज्या; ५० टक्के भाजीपाला फेकून दिला

पावसामुळे महागल्या भाज्या; ५० टक्के भाजीपाला फेकून दिला

Subscribe

मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे कामाचे दोन दिवस वाया गेले असताना त्यांना आता महागाईची झळ सोसावी लागणार आहे. सलग चार दिवसांच्या पावसामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे.

मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे कामाचे दोन दिवस वाया गेले असताना त्यांना आता महागाईची झळ सोसावी लागणार आहे. सलग चार दिवसांच्या पावसामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे. त्यातच पावसामुळे भाज्या खराब झाल्याने सुमारे ५० टक्क्यांहून अधिक भाज्या फेकून देण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईत भाज्यांचे दर वाढले आहेत.

मुंबईत पडलेल्या पावसाचा फटका भाजी विक्रेत्यांना बसला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधून मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये येणार्‍या ट्रकची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी घटली. गेल्या चार दिवसांत १०० हून अधिक ट्रक भायखळा मार्केटमध्ये दाखल झाले. मात्र मुंबईकर आणि किरकोळ व्यापारी याठिकाणी पोहचू न शकल्याने आलेल्या मालाची विक्री झालेली नाही. ग्राहकच नसल्यामुळे विक्रेत्यांनी आपला माल वाया जाऊ नये म्हणून कवडी मोलाच्या भावात विकायला सुरुवात केली. पावसामुळे पन्नास टक्क्याहून अधिक माल फेकून द्यावा लागला. फेकून देण्यात आलेल्या भाजीपालांमध्ये टोमॅटो, मेथी, पालक, चवळी, लिंबू आणि कोबी सारख्या अनेक भाज्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

बाजारात माल पुरेसा होता, मात्र मुसळधार पडलेल्या पावसामुळे ग्राहक खूप कमी होते. भाजीपाला खराब होऊ नये म्हणून म्हणून कवडीमोल भावात तो विकावा लागला.तरी सुद्धा पन्नास टक्के इतका माल खराब झाल्यामुळे तो फेकून द्यावा लागला.

 – शिवाजी जाधव, व्यापारी, भायखळा मार्केट

आधीच सर्व वस्तू इतक्या महाग झाल्यामुळे घर चालवणे अवघड झाले आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वेगवेगळी बिले भरणे, घराचा दिवसाचा खर्च, त्यात जर का आता पुन्हा भाजीपाल्यांचे दर जर वाढले तर त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.

- Advertisement -

– स्नेहल कदम, गृहिणी

असाही फटका

पावसाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात पालेभाज्या उपलब्ध असतात. पण पावसामुळे त्या खाणे टाळले जात असल्याने त्याचाही फटका बसत असून मोठ्या प्रमाणात पालेभाज्या तशाच पडून राहत असल्याची माहिती एका व्यापार्‍याने यावेळी दिली.

एपीएमसीमध्ये आवाक घटली

पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बटाटा,भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात बुधवारी ३९९ टेम्पो तर, ७८ ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मात्र या गाड्यांमधून भाजीपाला येण्याचे प्रमाण फारच कमी होते. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झाल्याने मार्केटमध्ये व्यापार्‍यांनी धाव घेतली.मात्र आवकच कमी असल्याने बुधवारीही किरकोळ बाजारातील दर वाढीवच असल्याचे आढळून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -