घरमुंबईकिरीट सोमय्यांची दादागिरी; भाजी विक्रेत्याला दिली धमकी

किरीट सोमय्यांची दादागिरी; भाजी विक्रेत्याला दिली धमकी

Subscribe

खासदार किरीट सोमय्या यांनी एका भाजी विक्रेत्याच्या हातातून पैसे खेचून ते पैसे फाडून त्या भाजी विक्रेत्यावर फेकल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. मुलुंडच्या राजे संभाजी मैदानाच्या बाजूला सोमय्या जनसंपर्कासाठी गेले असताना त्या ठिकाणी सचिन खरात हे भाजी विक्रेते भाजी विकत होते. या भाजी विक्रेत्याला किरीट सोमय्या यांनी त्या ठिकाणावर भाजी विकण्यास मनाई केली. याच वेळेस त्या ठिकाणी एका महिलेने त्या भाजी विक्रेत्यास भाजीचे पैसे देऊ केले. हे पैसे सोमय्या यांनी त्याच्या हातातून खेचून फाडले आणि फेकले. यावर नवघर पोलीस ठाण्यात या भाजी विक्रेत्याने तक्रार दिली असून सोमय्या यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी कोर्टातून परवानगी घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याच्या बाहेर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

“मी नाशिकवरुन भाज्या आणून विकतो. त्या दिवशी सकाळी भाजी विकत असताना किरीट सोमय्या जॉगिंगसाठी आले होते. त्यांनी मला त्या ठिकाणाहून उठायला सांगितले. ते येण्याआधी एका गिऱ्हाईकाने भाजी घेतली होती. त्याचे पैसे घेऊन मी उठणार होतो. पण ते पैसे किरीट सोमय्या यांनी हातातून हिसकावून घेऊन फाडले आणि माझ्या तोंडावर टाकले.”
-सचिन खरात, भाजी विक्रेता

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -