शनीच्या ‘या’ राशींमध्ये शुक्र करणार प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन 31 मार्च रोजी होणार असून, या दिवशी शुक्र देव सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. ग्रहांचं राशी परिवर्तन काही राशींसाठी लाभकारी मानलं जातं. तर काही राशींच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन-वैभव, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचं कारक मानलं जातं. शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन 31 मार्च रोजी होणार असून, या दिवशी शुक्र देव सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनी देवाला कुंभ राशीचा स्वामी मानलं जातं. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा प्रभाव या तीन राशींसाठी फायदेशीर ठरेल.

मेष (Aries)
शुक्राचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी लाभकारी ठरेल, खरंतर शुक्राची चाल या राशीच्या 11व्या घरात होईल, कुंडलीत 11व्या घराला आर्थिक स्थितीशी संबंधित मानलं जातं. अशावेळी मेष राशीच्या लोकांना उद्योग-धंद्यात, व्यापारात नवीन स्त्रोत बनतील. याबरोबरचं भागीदारीमध्येसुद्धा याचा फायदा होईल.

मकर (Capricorn)
मकर राशीमध्ये शुक्र दुसऱ्या घरात प्रवेश करेल, ज्योतिषशास्त्रात दुसऱ्या घराला धन आणि वाणीशी संबंधित मानलं जातं, अशावेळी शुक्राच्या राशी परिवर्तनाने मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीमध्ये पगारवाढ होऊ शकते. मकर राशीचे स्वामी शनी देव आहेत. शुक्र आणि शनि यांना मित्र ग्रह मानलं जातं. त्यामुळे मकर राशीतील लोकांना त्याचा विशेष फायदा होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)
कुंभ राशीसाठी शुक्राचं राशी परिवर्तन विशेष फायदेशीर ठरू शकतं. शुक्राचं संक्रमण याच राशीमध्ये होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांना भाग्य पूर्ण साथ देईल. व्यापारामध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. शुक्र आणि शनि यांना मित्र ग्रह मानलं जातं. त्यामुळे कुंभ राशीतील लोकांना त्याचा विशेष फायदा होऊ शकतो.