घरमुंबईमहाराष्ट्राची 'वहाण' संस्कृती जोपसणारा

महाराष्ट्राची ‘वहाण’ संस्कृती जोपसणारा

Subscribe

महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये हिंडून, तिथल्या अस्सल शैलीतल्या चपला, त्यांचे कारागीर, तिथली लोकप्रिय चप्पल, तिचं वैशिष्ट वगैरे सर्वकाही तो जाणून घेतोय.

पारंपरिक चप्पल म्हटलं की आपल्याला आठवतात त्या कोल्हापुरी चप्पला. पण कोल्हापुरी हा एकच पारंपरिक चप्पलाचा प्रकार नाही. त्याव्यतिरिक्तही अनेक चपलांचे प्रकार आहेत. नव्या रुपात, नव्या ढंगात लोकांसमोर नवनवीन चपलांचे प्रकार काही लोक अाणत असतात. काहीतरी क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह करायची इच्छा असलेला ‘भुषण कांबळे’ यापैकीच एक. भुषण रुपारेल कॉलेजचा पासआऊट. आयटीचे शिक्षण घेतल्यानंतर टीसीएस, विप्रोसारख्या नामांकित कंपन्यात त्याने काम केलं. त्यातही मुंबईतच कुटुंबाचे स्वतःचे चपलांचं दुकान. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. म्हणजे घर, नोकरी, बाकी जग वगैरे. पण आपण वेगळ्या वाटेने जायचं आणि काहीतरी वेगळं करायचं, हे डोक्यात पक्क असलेल्या भुषणने नोकरी ठिकठाक सुरु असतानाही थोडासा रिस्की आणि तितकचा आव्हानात्मक निर्णय घेतला. तो म्हणजे नोकरी सोडायचा. चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून द्यायची. चपला तयार करणाऱ्या कारागिरांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यासाठी चपलांना चपला न म्हणता ‘वहाण’ नावाचा ब्रँड तयार केला. कारागिरांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची त्याची धडपड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी त्याने ‘वहाण’ नावाची पारंपरिक चप्पलांची वेबसाईट सुरू केली.

मातीतल्या कारागिरांकडून प्रशिक्षण

भूषण आपल्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाबद्दल सांगतो की, “स्कील असणं किती गरजेचं आहे, याची जाणीव आहे. त्यासोबतच कॉर्पोरेटमध्ये स्कील असणाऱ्यांना किती किंमत असते हे मला माहितीये. त्यांना रिटेन करण्यासाठी कंपन्या हवी ती किंमत मोजायला तयार असतात. त्याच वेळी त्यांना कंपनी टिकण्यासाठी स्कील डेव्हल्पमेंट आणि नॉलेज ट्रान्संफरचं महत्त्व ठाऊक असतं. तेव्हा त्या त्या क्षेत्रातली स्कील नव्या लोकांपर्यंत पोहोचणं, हे त्या कलेसाठी तितकंच महत्वाचं असतं.”

- Advertisement -
फोटो
जाणत्या कारागिरांकडून प्रशिक्षण

‘वहाण’ ब्रँड यासाठी प्रयत्नशील आहे. मुरलेल्या जुन्या जाणत्या कारागिरांकडून नव्या विचारांच्या, नव्या उमेदीच्या कारागीरांपर्यंत ही कला कशी हस्तांतरित होईल, तिच्या मुळ आत्म्याला कसे जपले जाईल आणि त्यात नवीन कारागीर स्वतःच्या अभिव्यक्तीच्या इच्छेने काय काळानुरूप बदल घडवतात हे पाहणं गरजेचं आहे. नॉलेज आणि स्कील डेव्हल्पमेंटसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हा वहाणच्या मुलभूत संहितेमधला एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. मातीतल्या जुन्या कारागिरांकडून शिकलेली आणि नव्या कारागिरांकडून व्यक्त झालेली कलेची नविन आवृत्ती ही कलेसाठी नक्कीच भरभराटीची असेल, हा विश्वास भुषणला ‘वहाण’ बद्दल आहे.

पारंपरिक कारागीरांसाठी नवा प्लॅटफॉर्म

अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये हे कारागीर दडलेले आहेत. ज्यांच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने चपला बनवण्याचे काम करतात. या कारागिरांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी ‘वहाण’ हा नवीन प्लॅटफॉर्म आहे. या वेबसाइटचा उद्देश फक्त ऑनलाइन विक्री नसून ज्या लोकांना यापैकी एखादी कला शिकण्याची इच्छा असेल त्यांना कारागिरांशी संपर्क करुन देणे हा सुद्धा आहे. पारंपरिक पद्धतीने चपला बनवणाऱ्यांपैकी असेही काही कारागीर आहेत की ज्यांची पुढची पिढी या व्यवसायासाठी इच्छुक नाही. अशावेळी ती कला जोपासली जावी, या उद्देशाने ‘वहाण’च्या माध्यामातून ज्यांना हे शिकण्याची इच्छा आहे, त्यांना थेट कारागिरांशी संपर्क करता येणार आहे.

- Advertisement -

‘वहाण’मध्ये महिलांचाही सहभाग 

फोटो
महिला कारागीर

चपलांच्या सजावटीसाठी जी काही कामं असतात ती महिला कारागीर करतात. जसे की चपलांच्या डिझाईन वेण्या विणने, पट्टे बांधणे, इत्यादी. जे काही नजाकतीच काम असतं ज्यात बारकावा लागतो. महिला अतिशय काळजीपूर्वक ही कामं पार पाडतात.

वेबसाईटवर अनेक प्रकारच्या चपला उपलब्ध

भुषण कांबळेने www.vhaan.com ही वेबसाइट सुरु केली. या वेबसाइटवर वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक चपला विकत घेता येऊ शकतात. कोल्हापुर, अतनी, सोलापुर, सातारा, वाई, मेढा, महाबळेश्वर, रायगड, संगमेश्वर, निपाणी इत्यादी ठिकाणी बनणाऱ्या पारंपरिक चपलासुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पण कोल्हापुरी प्रमाणेच इतरही अनेक पारंपरिक पद्धतीने चपला बनवल्या जातात. ज्या आजपर्यंत आपल्या समोर आल्या नव्हत्या. त्या वहाणच्या निमित्ताने आपल्या समोर भुषण घेऊन आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -