घरमुंबईमध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये सराईत गुन्हेगार क्लिक होणार!

मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये सराईत गुन्हेगार क्लिक होणार!

Subscribe

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये एकात्मिक सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा आहे.

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये व्हिडिओ अॅनालिटिक्स कॅमेरे दाखल होणार आहेत. सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये एकात्मिक सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा आहे.

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांत गर्दीची मोजणी करण्यासाठी व्हिडिओ अॅनालिटीक्स कॅमेऱ्यांद्वारे मध्य रेल्वेने चाचणी घेतली होती. स्थानकात गर्दी वाढताच हे कॅमेरे सारखेच अलार्म वाजवू लागले. त्यामुळे आरपीएफ जवानांची धावपळ होऊ लागली. परिणामी हा प्रयोग थांबवण्यात आला.

- Advertisement -

निर्भया फंडातून फेस रिकग्जनेशन

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांमध्ये निर्भया फंडातून रेलटेल कंपनीद्वारे फेस रिकग्जनेशन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भुसावळ डिव्हीजनमध्ये अशा कॅमेऱ्यांची चाचणी घेण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर डोअरमध्ये प्रवाशांचा प्रवेश होताच प्रत्येक प्रवाशाचा चेहरा टिपणारे खास मेटल डिटेक्टर डोअर फ्रेमची सीएसएमटी आणि ठाणे रेल्वे स्थानकात चाचणी घेण्यात येणार आहे. तेव्हा प्रत्येक प्रवाशाचा चेहरा रेल्वे सुरक्षा बलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या चेहऱ्याशी साधर्म्य साधणारा निघाल्यास त्यावर कारवाई सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त के.के.अशरफ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -