घरमनोरंजनबिग बी अभिताभ बच्चन यांना टि्वट करणे पडले महागात

बिग बी अभिताभ बच्चन यांना टि्वट करणे पडले महागात

Subscribe

विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो कारशेडचा निषेध केला. बिग बी यांच्या घराबाहेर ऑक्सिजन कॅन घेऊन आंदोलन केले.

मेट्रो कारशेड बनविण्याकरिता महापालिकेने परवानगी दिली आहे. याप्रकरणी अनेक संस्था संघटना एकत्र येऊन या विरोधात लढा देत आहेत. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर द्वारे मेट्रो कारशेड बांधणीसाठी समर्थन केले. मेट्रो ही प्रगती करणारी आहे म्हणत मेट्रो सोईस्कर असल्याचं सांगताना त्यांनी आपल्या एका मित्राच्या उदाहरण देत आपल्या बागेत झाड लावावी असा टोला लगावला आहे. एका महानायकाने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हे जनतेसाठी अनपेक्षित आहे. मेट्रो कारशेड आमचा विरोध नाही पण इतर जागा उपलब्ध असताना आरे जंगलाची जागा निवडणे हे योग्य नाही, असे विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

नक्की वाचा महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांची ‘आरे वाचवा’ मोहीम

- Advertisement -

झाडे कापून त्याची कमतरता बाग भरून काढणार आहे का?

एक जंगल निर्माण होणे आणि एक बाग निर्माण करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आरेची २६४६ झाडे कापून त्याची कमतरता बाग भरून काढणार आहे का?, असा सवाल विद्यार्थी भारतीच्या राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी केला. जंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है! डॉन, असा नारा विदयार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून लावला. वाढत्या काँक्रिटीकरणाच्या काळात अशा पद्धतीने जंगले उद्ध्वस्त करणे हे निसर्ग विरोधी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ऑक्सिजन कमी होऊन पर्यावरणास आणि मानवास त्याचे तोटे अनुभवास येणार आहे.

अमिताभ बच्चन होश मैं आवो..

अर्थात हीच परिस्थिती राहिली तर मानवास ऑक्सिजन कॅन घेऊन फिरण्याव्यतिरिक्त पर्याय उरणार नसल्याचे विद्यार्थी भारतीच्या साक्षी भोर यांनी सांगितले. म्हणूनच आरे जंगलतोडीस समर्थन करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर ऑक्सिजन कॅन घेऊन निषेध नोंदविल्याचे वृत्त मुंबई अध्यक्ष अंजली वाघ यांनी दिले. ३० ते ४० विद्यार्थी यामध्ये सामील होऊन त्यांनी प्रतिक्षा बंगल्याचा परिसर अमिताभ बच्चन होश मैं आवो.. पर्यावरण वाचवा देश वाचवा… घोषणांनी दणाणला असल्याचे श्रेया निकाळजे यांनी म्हटले.

- Advertisement -

जंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है ! डॉन

जंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है ! डॉन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -