घरमुंबईरेल्वेने वार्‍यावर सोडले आता डॉक्टरांनी मार-मार मारले

रेल्वेने वार्‍यावर सोडले आता डॉक्टरांनी मार-मार मारले

Subscribe

विद्याविहार रेल्वे स्टेशनवरील अपघातात जखमी झालेल्या सद्दाम हुसेनला रेल्वेने वार्‍यावर सोडले आणि आता चक्क राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी डॉक्टरने त्याच्या कानफाडीत मारल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला.

विद्याविहार रेल्वे स्टेशनवरील अपघातात जखमी झालेल्या सद्दाम हुसेनला रेल्वेने वार्‍यावर सोडले आणि आता चक्क राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी डॉक्टरने त्याच्या कानफाडीत मारल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या अशा अमानुष वर्तणुकीमुळे सद्दामचे कुटूंबीय संतापले असून त्यांनी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. या घटनामुळे सर्व स्तरातून चीड व्यक्त केली जात आहे. याबाबत राजावाडी हॉस्पिटलच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीर्‍यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.

मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावर ३१ ऑगस्ट २०१८ ला भरदिवसा विटांनी भरलेला ट्र्क उलटून चार प्रवासी जखमी झाले होते. त्यातील २० वर्षीय सद्दाम हुसेन या तरुणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या दोन्ही पायाची हाडे तुटली आहेत. या चौघांना उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यातील ३ प्रवाशांना जास्त दुखापत नसल्याने त्यांना हॉस्पिटलमधून लवकर सोडण्यात आले. मात्र सद्दामच्या पायाला जास्त दुखापत असल्याने त्यांच्या पायाचे सोमवारी ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सद्दामला वार्ड क्रमांक ५ मध्ये ठेवण्यात आले होते. सद्दामच्या ऑपरेशनच्या जागेतून रक्त वाहत असल्यामुळे घाबरलेल्या हुसेन कुटूबियांनी डॉक्टरांना हाक मारली. तेव्हा ऑपरेशन बरोबर न झाल्याच्या शंकेवरून सद्दामच्या नातेवाइक त्याचा व्हिडीओ बनवत होते. जखमी सद्दामला खूप वेदना होत असल्याने तो ओरडत होता. त्यावेळी सद्दामची थुंकी डॉक्टरांच्या अंगावर उडली. तेव्हा डॉक्टरांनी मागे-पुढे न बघता जखमी सद्दामला कानफाडीत मारली. सद्दामच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या या वर्तणुकीला संतापून जखमी सद्दामला कुर्ला वेस्टच्या फोजीया हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

- Advertisement -

डॉक्टरांनी मागितली माफी
हुसेन कुटूंबियांनी डॉक्टरांच्या या वर्तणुकीची तक्रार राजवाडी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी सद्दाम हुसेनची माफी मागितली, अशी माहिती दैनिक ‘आपलं महानगर’ला सद्दामच्या नातेवाइकांनी दिली आहे. मात्र हुसेन कुटुंबियांनी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय अधिकार्‍याकडे केली आहे.

रेल्वेची तुटपुंजी मदत नाकारली
विद्याविहार अपघातातील सद्दाम हुसेन या तरुणाच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे. त्याच्या दोन्ही पायांची हाडे तुटली आहेत. तो किमान सहा ते सात महिने चालू शकणार नाही. अशा परिस्थितीत रेल्वेने सद्दामला नुकसान भरपाई किंवा चांगले उपचार देणेचे गरजेचे होते. मात्र त्याला अवघे ५ हजार रुपये देऊन रेल्वेने हात वर केले. यामुळे संतापलेल्या हुसेनच्या कुटुंबियांनी ही तुटपुंजी मदत नाकारली आहे. त्यामुळे हुसेन कुटुंबीय रेल्वेविरुद्ध न्यायालयात जाणार आहेत.

आज सद्दामशी डॉक्टरने केली वर्तवणूक दुसर्‍या रुग्णाबरोबर होऊ नये. यासाठी दोषी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये. यासाठी आता आम्ही कायद्यानुसार याबद्दल तक्रार करणार आहोत.
– इस्लाम खान, नातेवाईक.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -