Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी १० कोटींवरील कामांवर दक्षता विभागाचा वॉच

१० कोटींवरील कामांवर दक्षता विभागाचा वॉच

Subscribe

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे केली जातात. मात्र रस्ते कामे, नालेसफाई आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येतात. त्यामुळे सदर कामांत पारदर्शकता टिकून राहण्यासाठी पालिका १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामांवर यापुढे दक्षता विभागामार्फत वॉच ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे केली जातात. मात्र रस्ते कामे, नालेसफाई आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येतात. त्यामुळे सदर कामांत पारदर्शकता टिकून राहण्यासाठी पालिका १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामांवर यापुढे दक्षता विभागामार्फत वॉच ठेवण्यात येणार आहे. (Vigilance department watch on works above 10 crore)

सध्या मुंबईत विविध प्रकारची सुशोभीकरणाची कामे, रस्ते, पूल दुरुस्ती आदी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. युवासेनेचे नेते, माजी मंत्री व विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी, पालिकेच्या रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नुकताच केला. तसेच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही, नालेसफाईच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करीत कामे नीटपणे झाली नसल्याचे सांगत शंका उपस्थित केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे पालिकेला त्या आरोपांबाबत खुलासाही करावा लागला. पालिकेने विकास कामांबाबत होणाऱ्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामांवर यापुढे दक्षता विभागामार्फत वॉच ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या ४०० किलोमीटर लांबीचे व सहा हजार कोटीं रुपयांची रस्त्यांची कामे सुरु आहेत. सदर कामे योग्य पद्धतीने होत आहेत का, रस्ते कामांत वापरण्यात येणारे साहित्य योग्य व दर्जेदार आहे का, याची पाहणी करून तपासणी करण्यात येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची घोषणा

- Advertisment -