घरमुंबईविजय रुपाणी यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

विजय रुपाणी यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Subscribe

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रुपाणी पत्रकार परिषदे आधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी मराठी माणूस?

रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील या मराठी माणसाची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. सी. आर. पाटील हे सध्या गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रातील जळगावमध्ये जन्मलेले सी. आर. पाटील यांचे शिक्षण गुजरातमधील सुरतमध्ये झाले आहे. १७ व्या लोकसभेत ते सुरत मतदार संघातून तब्बल ५ लाख ५८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मतदारसंघात सरकारी सेवेचे देखरेख आणि उत्तम प्रशासनासाठी पाटील यांच्या कार्यालयाला आयएसओ सर्टिफिकेट मिळाले आहे. असे सर्टिफिकेट मिळालेले देशातील ते पहिलेच खासदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -