Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवेशाबाबत विजय वड्डेटीवार यांची मोठी घोषणा !

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवेशाबाबत विजय वड्डेटीवार यांची मोठी घोषणा !

मुंबईकरांसाठी २४ तास सेवेत असलेल्या मुंबईच्या लोकलने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पहावी लागणार

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली मुंबईची लोकल तूर्तास सर्वसामान्यासाठी बंद राहणार आहे. (Mumbaikars don’t have to travel by local ) मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहून लोकलबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवेशाबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी २४ तास सेवेत असलेल्या मुंबईच्या लोकलने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पहावी लागणार आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करुन आणखी धोका पत्करु शकत नाही,असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Vijay Vaddetiwar big announcement about Mumbai local )

मुंबईची आकडेवारी कमी जास्त होत असेल त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर पुढील आठवड्यात सर्वसामान्याच्या लोकल प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मात्र तूर्तास तरी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असेल. मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार का यासाठी आणखी आठवडाभराची वाट पहावी लागणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्र सरकारने राज्यात अनलॉकसाठी काही योजना तयार केल्या आहेत. सरकारने जारी केलेल्या निवेदनात राज्यातील अनलॉकची प्रक्रिया पाच टप्प्यात असणार आहे. ज्यात ठाणे लेव्हल एक तर मुंबई लेव्हल दोनमध्ये असल्याचीही माहिती विजय वड्डेटीवार यांनी दिली. लेव्हल एकमध्ये ठाण जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम हटवण्यात येतील. त्यानंतर मुंबईतील लॉकडाऊन हळू हळू उठवण्यात येणार आहे.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यात ५ टप्प्यात अनलॉक आणि लॉकडाऊन; कोणते जिल्हे कोणत्या टप्प्यात जाणून घ्या

- Advertisement -