घरमुंबई'बसंत रानी'ने महामार्गाचे पालटले रुपडे

‘बसंत रानी’ने महामार्गाचे पालटले रुपडे

Subscribe

वसंत येण्याआधीच 'बसंत रानी' च्या फुलांनी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती महामार्ग बहरला आहे. महामार्गाच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर महापालिकेकडून ६ हजार वृक्ष लावण्यात आली आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती महामार्गाचे रुपडे पालटले आहे. वसंत येण्याआधीच ‘बसंत रानी’ च्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला आहे. महामार्गाच्या छेडा नगर ते विक्रोळी या भागात आणि विशेष करुन महामार्गाच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर ‘बसंत रानी’ वृक्ष लावण्यात आली आहेत. पर्यावरणाच्या आणि सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमध्ये ‘बसंत रानी’ या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणाऱ्या या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. मात्र, यावर्षी वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वीच ही झाडे फुलांनी बहरली आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रात ६ हजार ५०० ‘बसंत रानी’ वृक्ष

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच सुशोभिकरणही साधले जावे, या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वृक्षारोपण आणि वृक्ष जोपासना नियमितपणे केली जात असते. गेल्या वर्षी झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५०० पेक्षा अधिक ‘बसंत रानी’ वृक्षांचाही समावेश आहे. हिंदी भाषेत ‘बसंत रानी’ अशी ओळख असणाऱ्या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’ (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea) असे आहे. तर याच झाडाला इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते.

- Advertisement -

फुलांनी डवरलेली ‘बसंत रानी’ ची झाडे नागरिकांचे आणि पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. या झाडांचे वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केली जातात.  – जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -