CoronaVirus: कोरोनाबाधित नर्समुळे विक्रोळीतील झोपडपट्टी हॉटस्पॉटवर

विक्रोळीतील गोदरेज हॉस्पिटलमधील परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

vikhroli slum area hotspot for one found coronavirus patient

मुंबईतील झोपडपट्टीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता विक्रोळीतील झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. विक्रोळी कन्नमवार नगरमधील झोपडपट्टीमध्ये बुधवारी कोरोनाबाधित २१ वर्षीय महिला सापडली. ही महिला गोदरेज हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असून, तिला हॉस्पिटलमध्ये आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून बाधा झाली आहे. तसेच झोपडपट्टीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोदरेज हॉस्पिटलमध्ये ३० मार्चला दाखल झालेल्या एका रुग्णांवर या परिचारिकेने उपचार केले होते. उपचारादरम्यान ३ एप्रिलला त्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेली ही परिचारिकेला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिने स्वतः ला होम क्वारंटाईन करून घेतले. मात्र तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे कन्नमवार नगरमध्येच राहणाऱ्या सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी दोन रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा चारवर पोहोचल्याने कन्नमवार नगरमध्ये खळबळ माजली आहे.

गोदरेज हॉस्पिटलमधील आणखी एका परिचारिकेला लागण

कन्नमवार नगरमधील या परीचारिकेबरोबरच त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या आणखी एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. ही परिचारिका भांडुपमधील रहिवासी आहे.


हेही वाचा – नो टीईटी, नो पेमेंट; ५ वी ते ८ वीच्या शिक्षकांना एप्रिलचे वेतन नाही