मुंबईः विक्रोळी येथे २३ व्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
विक्रोळी पश्चिमेला श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील लिफ्टचे बुधवारी काम सुरु होते. दुपारी अडीचच्या सुमारास २३ व्या मजल्यावरील लिफ्ट अचानक कोसळली. लिफ्टमध्ये तीन कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला तत्काळ देण्यात आली. अग्रिशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्रिशमन दलाने लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना बाहरे काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तिन्ही कामगारांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले. या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याताल शिवम जैस्वाल (२०) याचा मृत्यू झाला. उपचारापूर्वीच डॉक्टारांनी शिवमला मृत घोषित केले. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.