घरमुंबईचौर्यकर्मातील ‘उसूल’ घरफोड्या करून गावात पाणीपुरवठा योजना

चौर्यकर्मातील ‘उसूल’ घरफोड्या करून गावात पाणीपुरवठा योजना

Subscribe

हिंदी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि प्राण यांचा मजबूर नावाचा एक चित्रपट सत्तरच्या दशकांत प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील एक संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यात अमिताभ (विजय) चोरटा असलेल्या (मायकल) प्राणला म्हणतो ‘चोरों के भी कुछ उसूल होते है’, त्यावर प्राणने अमिताभला ‘चोरों के ही तो उसूल होते’ है असं तडाखेबंद उत्तर दिलेलं होतं. सिनेमातील कथा शोभावी अशाच चौर्यकर्मातले उसूल पाळणारे दोन चोरटे पोलिसांनी जेरबंद केले आहेत. मात्र खर्‍याखुर्‍या पोलीस आणि कायद्याने त्यांना गजाआड पोहचवले आहे.

या दोन चोरट्यांची भेट चित्रपटातल्या कथानकाला शोभेल अशा पनवेलमधील पेट्रोलपंपावरील एका भांडणातून झाली. त्यानंतर हे एकमेकांचे ‘दुष्मन’ जिगरी दोस्त बनले. नंतर चौर्यअवगुण जुळल्यामुळे या दोघांनी मिळून घरफोडी करण्याचा निर्णय घेतला

- Advertisement -

यातील एक जण स्क्रूड्रायव्हरचा वापर करून काही क्षणात दरवाजाचे टाळे उघडायचा व घरांमध्ये शिरून किंमती साहित्य घेऊन पळ काढायचा, तर दुसरा त्याला चोरीकामात मदत करायचा.

या दोघांनी मिळून 2017 पासून तब्बल 26 ठिकाणी घरफोडी केल्या.या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करून चौकशी केली असता पोलिसांना थक्क करणारी माहिती समोर आली. या दोघांनी चौर्यकामात आपले काही नियम बनवले होते. मराठी नागरिक राहत असलेल्या घरांमध्ये चोरी करायची नाही. आठवड्याच्या शेवटी आणि सण उत्सवाच्या दिवशीही चोरी करायची नाही, असेही ठरवले या दोघांनी ठरवले होते.

- Advertisement -

हिंदी चित्रपटात चोरीच्या पैशांतून नायक समाजोपयोगी कामे करतात, तशीच या चोरट्यांनीही चोरीतून मिळवलेल्या पैशांतून घर खरेदीसह गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविल्याचेही उघडकीस आले आहे. चोरीच्या नियमांची आणि चोरीच्या पैशांतून समाजोपयोगी कामांचे कथानक चित्रपटात शोभते, वास्तवात नाही. कायद्यापुढे चोरीच्या कामाला शिक्षा मिळतेच, यातूनच हे दोन ’उसूल’ वाले चोरटेही गजाआड गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -