संभाजी राजेंविषयी निर्णय उद्धव ठाकरेंच घेऊ शकतात – विनायक राऊत

Rajya Sabha Election 2022 Sambhaji Raje turn back to Shiv Sena party entry offer

संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. याबाबत त्यांनी पुण्यात घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा या निवास्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे.

नितेश राणेंच्या वायफळ बडबडीला आम्ही काडीची किंमत देत नाही. स्वार्थासाठी राजकारण करणार राणे घराणे आहे. संभाजी राजेंनी जर उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली तर त्यात नाक मुरडण्यासारखे काय आहे? संभाजी राजे खासदार होऊ नये या इच्छेने काहीजण पछाडले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे. मात्र, संभाजी राजेंविषयी निर्णय उद्धव ठाकरेंच घेऊ शकतात. आज ते त्यांना भेटायला गेले होते, उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असे सूचक विधान विनायक राऊत यांनी केले आहे.

राज्यातून 6 जागा राज्यसभेवरून नवडून दिल्या जाणार आहेत. 2 भाजप, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, तर 1 शिवसेना असे राज्यसभेचे गणित आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.