घरमुंबईमुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवाच फडकणार - विनायक राऊत

मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवाच फडकणार – विनायक राऊत

Subscribe

शिवसेनेचे नगरसेवक हे आपल्या विभागातील विकास कामे चोखपणे पार पाडतात. त्यामुळे या विकासकामांच्या जोरावर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विरोधकांना गाडून शिवसेनेचे नगरसेवक बहुसंख्यने निवडून येतील. पालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, असा दावा शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. घाटकोपर येथे रविवारी काही विकास कामांच्या उदघाटनपर कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी वरीलप्रमाणे दावा केला.

ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे वार्ड क्रमांक १२७ मधील नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या निधीमधून गोळीबार रोड येथे उभारण्यात आलेल्या दुमजली शौचालय, इंदिरा नगर येथील पुनर्विकसित शौचालय, ओम गणेश मित्र मंडळ येथील बालवाडी, व्यायाम शाळा आणि काजोलकर सोसायटी नजीक, शिवसागर येथील नूतनीकरण केलेले मैदान आदी विकास कामांचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी, शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, उप विभागप्रमुख सुनिल मोरे, शाखाप्रमुख संजय कदम, उप शाखाप्रमुख शशिकांत देशमुख, जगदीश कदम, दीपक उतेकर, संजय फाळके, सुनील नार्वेकर, नरेश घरत, जगन चिकणे, दत्ता रिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

वार्ड क्रमांक १२७ मधील शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या निधीमधून करण्यात आले आहे. त्यांचे उदघाटन खासदार नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम पाटील यांच्या सारखे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेचे सेवक, मित्र म्हणून सतत विकास कामे करतात. मुंबईत कोरोनाच्या कालावधीत शिवसेनेने, नगरसेवकांनी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी झोकून देत तत्परतेने मदत कार्य केले. त्यावेळी बाकीच्या पक्षाचे लोक कोणत्या तरी बिळात लपून बसले होते. याउलट भाजपचे नगरसेवक त्यांच्या नेत्यांप्रमाणे कामे न करता फक्त ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ अशी टिवटिव करीत असतात. त्यामुळे येथून पुढील २५ वर्षे शिवसेनेच्या नगरसेवकांशिवाय दुसरा नगरसेवक निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम हे काही काम न करता फक्त शिवसेनेच्या कामांचे श्रेय घेत असतात, अशी टीकाही त्यांनी याप्रसंगी केली. ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी, सेना-भाजप युती असताना भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या कामाच्या आणि मतांच्या जोरावरच निवडून येत होते, असा दावा करीत भाजपवर तोफ डागली. तसेच, नगरसेवक तुकाराम पाटील यांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, आम्ही जास्तीत जास्त विकास कामे केली असून ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण केले असल्याचा दावा केला. वार्डातील रस्ते, शौचालये, मैदाने, बालवाड्या, खुल्या व्यायाम शाळा, सुरळीत पाणी पुरवठा, उद्याने, स्वच्छता आदी विविध स्वरूपाची विकासकामे केल्याचे सांगितले. शाखाप्रमुख संजय कदम यांनी, समाजकारणाचा वसा घेतलेल्या शिवसैनिकांनी कोरोना कालावधीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -