घरमनोरंजनViral Video | "ब्रह्मास्त्र" या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरचा रोमँटिक अंदाज

Viral Video | “ब्रह्मास्त्र” या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरचा रोमँटिक अंदाज

Subscribe

या चित्रपटामधून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले असून, ट्विटरवर #Brahmastra ट्रेंडिंग चालत आहे. रणबीर आणि आलिया ही बॉलिवूडमधील प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. त्यामुळे "ब्रह्मास्त्र" चित्रपट लवकर प्रदर्शित करावा, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ह्या दोघांना आपण एकत्र फिरताना पाहिलं आहे. विशेष म्हणजे ते लवकरच लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे आता ते आपल्याला एकत्र काम करताना दिसणार आहेत. हे दोघे “ब्रह्मास्त्र” या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यांचा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. “ब्रह्मास्त्र” हा चित्रपट लवकर रिलीज होणार असून, ह्या चित्रपटाची शूटिंग वाराणसीमध्ये सुरू आहे.

या चित्रपटामधून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले असून, ट्विटरवर #Brahmastra ट्रेंडिंग चालत आहे. रणबीर आणि आलिया ही बॉलिवूडमधील प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. त्यामुळे “ब्रह्मास्त्र” चित्रपट लवकर प्रदर्शित करावा, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

- Advertisement -


ब्रह्मास्त्र चित्रपटामधील रणबीर आणि आलिया भट्ट यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून, हे सर्व फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या “ब्रह्मास्त्र” चित्रपटामधील गाण्याचे शूटिंगदरम्याचे आहेत. डान्स करताना आणि बोटीमध्ये बसलेले व्हिडीओमध्ये दोघे पाहायला मिळतायत. त्याचप्रमाणे सोशल मिडियावरील युजर्स “ब्रह्मास्त्र” या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

“ब्रह्मास्त्र” चित्रपटामध्ये आलिया भट्ट ही ईशा नावाची भूमिका साकारत आसल्याचे तिने तिच्या 29व्या वाढदिवशी सांगून ब्रह्मास्त्र चित्रपटामधील पहिला लूक रिलीज केला आहे. “ब्रह्मास्त्र” चित्रपट 29 सप्टेंबर 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तसेच आलिया आणि रणबीरचा “ब्रह्मास्त्र” चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. “ब्रह्मास्त्र”बरोबर आलिया “आरआरआर” आणि “रॉकी और रानी की प्रेम कहानी” आणि “जी ले जरा” या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे रणबीर हा “एनिमल” आणि “शमशेरा” या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक या सर्व चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -