Eco friendly bappa Competition
घर मुंबई भिवंडीत व्यापारी , फेरीवाल्यांसाठी मतदान जनजागृती मोहीम

भिवंडीत व्यापारी , फेरीवाल्यांसाठी मतदान जनजागृती मोहीम

Subscribe

 भिवंडी लोकसभा निवडणूकीसाठी महानगरपालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये महिला बचत गट,शिक्षक व पालक संघटना सभा,मतदार जनजागृती प्रचार रॅली,सामाजिक शैक्षणिक संघटना यांच्या भेटीगाठी,पथनाट्याद्वारे,रिक्षाद्वारे दवंडी उपक्रम जोमाने सुरु आहे. शहरातील विविध व्यापारी संघटना,फेरीवाला संघटना,भाजी मार्केट येथील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्यामध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

व्यापारी वर्गाने त्यांनी मतदानाच्या दिवशी त्यांच्या आस्थापनेतील कर्मचार्‍यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी रजा द्यावयाची आहे किंवा मतदानाकरीता कर्मचारी वर्गाला मतदान करण्यासाठी कामात सवलत द्यायची आहे.मतदान जनजागृती कार्यक्रम उपक्रम एक भाग म्हणून लाहोटी कंपाऊंड येथील कापड व्यापारी बाजारात स्थानिक स्वराज संस्था,विभाग प्रमुख आदिल पावले यांनी मतदार जनजागृती केली.

- Advertisement -

दुसर्‍या एका उपक्रमात प्रभाग समिती क्र.४ मध्ये कार्यालय अधिक्षक संजय पुण्यार्थी यांच्या पुढाकाराने भैरव पॉलिफिल्म गौरीपाडा,भंडारी चौक नारपोली येथे तर प्रभाग समिती क्र. १ अंतर्गत प्रभाग अधिकारी बाळाराम जाधव यांच्या पुढाकाराने ताज साईजिंग येथे तेथील कर्मचार्‍यांच्या भेटी घेऊन मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक मतदान अधिकारी बाळाराम जाधव यांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी मतदान करून हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.व्यापारी वर्ग यांच्याकरिता ईव्हीएम मशीन प्रशिक्षण देण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -