घरमुंबईठाणे जिल्ह्यात 2 लाख 60 हजार बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत

ठाणे जिल्ह्यात 2 लाख 60 हजार बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत

Subscribe

अवघ्या 12 हजार जणांना नोकरी

केंद्र सरकारकडून लाखो रोजगार उपलब्ध झाल्याचे दावे केले जात असले तरी हा दावा किती फोल ठरत आहे, हे राज्य सरकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्यात 2 लाख 60 हजार सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत असून आतापर्यंत केवळ 12 हजार तरुणांना नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे बहुतांशी नोकरी ही खासगी कंपन्यांमध्ये मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा स्वयंरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती. नोंदणी करण्यासाठी मोठी रांग लागत होती. पण 2013 पासून ही सेवा ऑनलाईन झाल्याने सुशिक्षित तरुण तरुणी घरबसल्या नोंदणी करीत आहेत. आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल केला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अशा नावाने ओळखला जात आहे.

- Advertisement -

नाव्हेंबर अखेरपर्यंत 36 हजार 140 बेरोजगारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, 2 लाख 72 हजार 159 इतके नोंदणीकृत सुशिक्षित बरोजगार आहेत. यापैकी केवळ 12 हजार 97 बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खासगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून सरकारी व निमसरकारी क्षेत्रातील रोजगारांची संख्या नगण्य आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी अशा अनेक सरकारी निर्णयामुळे आलेल्या मंदीने खासगी क्षेत्रातील नोकर्‍यांचीही संधी कमी झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे असलेला आकडा हा केवळ नोंदणीकृत आकडा आहे. मात्र प्रत्यक्षात बेरोजगारांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 5 ते 6 रोजगार मेळावे घेतले जातात. त्यातूनही बेरोजगारांना संधी मिळते. तसेच उमेदवारांकडे अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि अनुभवही मिळत नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या कालावधीत शासनाकडून तीनशे ते एक हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते. मात्र हे अत्यंत तुटपुंजे ठरत आहे.

- Advertisement -

उमेदवारांच्या नोंदणीचा तक्ता

सन उमेदवारांची नोंदणी उमेदवारांचा नोंदणीपट

2015 28562 186846
2016 27602 183658
2017 23211 206909
2018 34977 241886
नोव्हेंबर 2019 36140 272159

ऑनलाइन यंत्रणा झाल्यामुळे सुशिक्षित बरोजगार हे घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करतात. ही नोंदणी मोफत असल्याने सर्वांनी करणे गरजेचे आहे. खासगी आस्थापनांनाही नोंदणी व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. बेरोजगारांची समस्या निवारण करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. व्यवसाय मार्गदर्शन तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बेरोजगारांच्या सेवा सोसायटया स्थापन करून त्यांच्यामार्फत सुविधा पुरविण्यात येतात.
-कविता जावळे, सहाय्यक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -