घरमुंबईविक्रोळीत कोसळली भिंत; जीवितहानी नाही

विक्रोळीत कोसळली भिंत; जीवितहानी नाही

Subscribe

विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर ७ स्मशानभूमीच्या जवळील सर्विस रोड येथील संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विक्रोळीतील कन्नमवार नगर २ मधील इमारतीची गॅलरी कोसळल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा विक्रोळी टागोर नगर येथील स्मशानभूमीच्या जवळील सर्विस रोड येथील भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर ७ स्मशानभूमीच्या जवळील सर्विस रोड येथील संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या ठिकाणी कोसळली भिंत

विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर ७ येतील स्मशानभूमीच्या जवळील सर्विस रोड येथील आज सकाळी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिंत कोसळल्याची घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी कोसळलेल्या भिंतीचा भाग उचलण्याचे काम सुरु आहे.

- Advertisement -

याआधी देखील मुसळधार पावसामुळे मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली होती. तर पावसामुळे सोमवारी रात्री मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा हकनाक बळी गेला होता. त्याचबरोबर पुण्याच्या कोंडवा परिसरातही इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा बळी गेला होता. तर सोमवारी मध्यरात्री कल्याणच्या नॅशनल उर्दू शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेतही ३ जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला राहणार बंद

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत पावसाची जोरदार हजेरी ४ वाजता हायटाईड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -