घरमुंबईभटक्या मांजरांच्या निर्बिजीकरणाला जानेवारीपासून सुरुवात

भटक्या मांजरांच्या निर्बिजीकरणाला जानेवारीपासून सुरुवात

Subscribe

मुंबईतील भटक्या कुत्र्यांपाठोपाठ आता भटक्या मांजरांचेही निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नवीन वर्षांतील पहिल्याच महिन्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

मुंबईतील भटक्या कुत्र्यांपाठोपाठ आता भटक्या मांजरांचेही निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नवीन वर्षांतील पहिल्याच महिन्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यासाठी चार अशासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या संस्थांशी करारानामा पूर्ण करून कार्यादेश दिल्यानंतर प्रत्यक्षात जानेवारीपासून मांजरीच्या निर्बिजीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मांजरींच्या निर्बिजीकरणासाठी प्रत्येकी नर मांजरासाठी प्रत्येकी ६०० ते ८०० रुपये तर मादी मांजरांच्या नसबंदीसाठी ८०० ते १००० रुपये मोजले जाणार आहे.

निर्बिजीकरणासाठी प्रत्येकी ८०० ते १००० रुपयांचा खर्च

प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत श्वान नियंत्रण विभागाच्यावतीने १९९४ पासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. त्यानंतर १९९८ पासून न्यायालयाच्या निर्देशानुसार अशासकीय संस्थांच्या मदतीने हा कार्यक्रम पुढे राबवण्यात येत आहे. मुंबईत बहुसंख्य प्राणीप्रेमींच्या घरांमध्ये कुत्रा, मांजर आणि अन्य प्राणी पाळले जातात. मुंबईत कुत्र्यांच्या संबंधात नियंत्रण ठेवण्याची तरतूद असली तरी मांजरांबाबत तशी तरतूद नव्हती. विशेषत: झोपडपट्टी चाळींमध्ये मांजरांची संख्या अधिक आढळते. काही वेळा मांजराने नख मारल्याने किंवा चावल्याने गंभीर इजा होण्याच्या दुर्घटना घडत असतात. मुंबई महापालिका रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. त्याच धर्तीवर महापालिकेने भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

मांजरांच्या निर्बिजीकरणासाठी चार संस्था पात्र ठरल्या असून प्रत्येक वर्षी सुमारे दहा ते पंधरा हजार भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाचे लक्ष्य आहे. प्रति वर्षी एक कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांकरता ३ कोटी रुपये रुपये अंदाजित खर्च अपेक्षित असल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले. या अशासकीय संस्थांना भटक्या मांजरांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणासाठी ६०० ते ८०० रुपये दिले जाणार आहे. तर ज्या संस्था स्वत:च भूखंडाची व्यवस्था करून वीज आणि पाण्याचा खर्च भागवत आहेत, त्यांना ८०० ते १००० रुपये एवढे दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सर्वप्रकारची करारनामा पूर्ण झाल्यानंतर या जानेवारी महिन्यापासून मांजरांच्या निर्बिजीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मांजरांच्या निर्बिजीकरणासाठी स्वतंत्र पिंजर्‍यांची आवश्यकता असल्याने त्याची व्यवस्था झाल्यानंतर आता प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे डॉ. योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले.

नसबंदीसाठी निवड झालेल्या अशासकीय संस्थांची नावे

  • बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज
  • इन डिफेन्स ऑफ ऍनिमल
  • युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी
  • ऍनिमल अँड बर्ड केअर अँड अ‍ॅडवान्स रिसर्च सेंटर

महापालिकेने भूखंडासह वीज व पाण्याचा खर्च मोफत केल्यास

नर मांजर : ६०० रुपये, मादी मांजर : ८०० रुपये तर संस्थांनी भूखंडासह वीज आणि पाण्याचा खर्च स्वत: भागवल्यास नर मांजर : ८०० रुपये, मादी मांजर : १००० रुपये.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील १२० ऑर्केस्ट्रा, डिस्कोबारविरोधात धडक कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -