घरताज्या घडामोडीवारीस पठाण यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले, माध्यमांशी बोलण्यास मनाई!

वारीस पठाण यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले, माध्यमांशी बोलण्यास मनाई!

Subscribe

‘आम्ही १५ कोटी आहोत. मात्र, १०० कोटींवर भारी आहोत’, असे चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथील जाहीर सभेत केल्यानंतर आता त्याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले आहेत. दरम्यान, वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर ओवैसी नाराज झाले असून, पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश पसरतो, अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वारिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, वारिस पठाण यांच्याविरोधात संघर्ष या सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुंबईत सांताक्रूज येथे देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये भाजपच्या वतीने भायखळा येथे आंदोलन करण्यात आले आहे. तर औरंगाबादेमध्ये देखील वारिस पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली असून, वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहेत.

- Advertisement -

मनसेचा मनसे स्टाईल इशारा

एकीकडे वारिस पठाण यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पठाण यांचा समाचार घेण्यात आला असून, ‘आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण… ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकेच सांगतो की, जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल’, असं लिहिलं आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी वारिस पठाण चुकून आमदार झाल्याचे म्हणत जोरदार टीका केली.


वाचा सविस्तर – MIMचे वारिस पठाण बरळले, म्हणे ‘आजादी छीन के लेनी पडेगी’!

‘वारिस पठाण यांना पक्ष विचारणा करेल’

दरम्यान, एमआयएमने मात्र वारिस पठाण यांची पाठराखण केली आहे. ‘वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. माध्यमांचा हा सिलेक्टिव्ह अॅप्रोच आहे. इतका जोश वारिस पठाण यांच्याबाबत दाखवता तितका अनुराग ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत का दाखवत नाही? वारिस पठाण यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करत नाही. फक्त त्यांच्या बोलण्याचा अर्थ लोकांनी बदलला, ट्विस्ट केले, आमच्या पक्षाचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही सगळ्यांसोबत आहोत. त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांना लिखित मागवू. पक्ष त्यांना याची विचारणा करेल’, असं इम्तियाज जल्ली म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -