घरताज्या घडामोडीअत्यावश्यक सेवेतील गैरहजर राहणाऱ्या कामागारांना निलंबित करण्याचा इशारा

अत्यावश्यक सेवेतील गैरहजर राहणाऱ्या कामागारांना निलंबित करण्याचा इशारा

Subscribe

चालक-वाहकांसह बेस्टच्या अत्यावश्यक सेवेतील कामगार गैरहजर राहत आहेत. पाच दिवसांपेक्षा अधिक गैरहजर राहणाऱ्यांवर उपक्रम कारवाई करणार आहे.

बेस्टमधील परिवहन आणि विद्युत पुरवठा विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गैरहजर राहत आहे. त्याचा परिणाम परिवहनसह विद्युत सेवेवरही होत असल्यामुळे यासर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे जे कर्मचारी, कामगार पाच दिवसांपेक्षा अधिक गैरहजर असतील त्यांनी त्वरीत सेवेत रुजू व्हावे, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल, असा फतवा बेस्ट उपक्रमाने बजावला आहे. त्यामुळे अखेर घाबरुन सुट्टीवर असलेल्या कामगारांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

६० ते ७० टक्केच कर्मचाऱ्यांच्या बळावरच उपक्रमाचा गाढा हाकला

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे होळीनिमित्त गावी गेलेले अनेक कामगार, कर्मचारी गावीच अडकून पडले आहे. सर्व आगारांमधील तब्बल १० टक्के कर्मचारी आणि कामगार गावी अडकून पडल्यामुळे उर्वरीत ९० टक्के कर्मचाऱ्यांपैकी ६० ते ७० टक्केच कर्मचाऱ्यांच्या बळावरच उपक्रमाचा गाढा हाकला जात आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे बेस्टचे बहुतांशी कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे याचा परिणाम आता बेस्टच्या सेवेवर होत आहे. एका बाजुला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यांवर बसेस आणणे आवश्यक आहे. मात्र, दुसरीकडे वाहक आणि चालकांची संख्या कमी झाल्यामुळे रस्त्यावर पुरेशा बसेस उतरवणेही शक्य होत नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सुट्टीवर राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी परिपत्रक जारी केले असून यामध्ये पाच दिवसांपेक्षा अधिक सुट्टीवर असल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असे म्हटले आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढण्याच्या विचारात प्रशासन आहे. अद्याप काढलेले नाही. बेस्टचे जे कामगार, कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत आणि २२ तारखेपासून मुंबईत राहत असूनही सेवेत रुजू होत नाही, त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगारांनी सेवेत रुजू व्हायलाच हवे. परंतु निलंबित करण्याचा इशारा नाही. पण अशाप्रकारे परिपत्रक काढण्याऐवजी उपक्रमाने मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कामगारांना घरी पत्र पाठवून अथवा माणूस पाठवून सेवेत परतण्याची नोटीस द्यावी, अशी आपण सूचना केल्याचे सामंत यांनी सांगितले.

४ मार्च रोजीचे परिवहन विभागाचे कर्मचारी आणि बस फेऱ्या

बसेसची संख्या : शेड्युल्ड केल्या २८२१ आणि प्रत्यक्षात होत्या १०२९

- Advertisement -

बस वाहकांची संख्या : ३७२३च्या तुलनेत १३१६

बस चालकांची संख्या : ३५६३च्या तुलनेत १४०९

बस निरिक्षकांची संख्या : १८६च्या तुलनेत ९१

बस स्टाटर्सची संख्या : २२०च्या तुलनेत ९३


हेही वाचा – ‘त्या’ वृत्तामुळे वडाळा बेस्ट आगारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -