घरमुंबईमुंबई पोलीस होण्याचं स्वप्न अधुरे, भरतीदरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न अधुरे, भरतीदरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Subscribe

मुंबई पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यासाठी आजची सकाळ काळ ठरली. मुंबई पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणाचा धावताना अचानक मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील कलिनामधील मुंबई विद्यापीठाच्या मैदानात आज सकाळी घडली. गणेश उगले असे या तरुणाचे नाव आहे.

मुंबई पोलीस दलात सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे. सांताक्रुझमधील कलिनामधील मुंबई विद्यापीठाच्या मैदानात ही भरती सुरु असताना एका उमेदवाराचा आज सकाळी अचानक मृत्यू झाला, मैदानी चाचणीत धावताना चक्कर आल्याने हा तरुण अचानक जमिनीवर कोसळला. यावेळी उपस्थितीत डॉक्टरांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाला होता. २७ वर्षाचा हा तरुण वाशिमचा असल्याची माहीती आहे.

- Advertisement -

या तरुणाने मैदानी चाचणीत 1600 मीटर धावणी पूर्ण केली आणि अचानक तो खाली कोसळला, गणेश हा चुलत भावासोबत मुंबईत आला होता, या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याकडे गणेशबाबत चौकशी केली, मात्र सकाळपासून त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं त्याच्या चुलत भावाने सांगितले. त्यामुळे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


निक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलिसांची दिशाभूल, हत्येची वेळ सांगितली चुकीची

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -