घरताज्या घडामोडीधावत्या लोकलवरील हल्ले रोखण्यासाठी वॉच टॉवर

धावत्या लोकलवरील हल्ले रोखण्यासाठी वॉच टॉवर

Subscribe

स्थानकावरून दूरवर नजर ठेवणे वॉच टॉवरमुळे शक्य होणार आहे.

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नव्या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे स्थानकादरम्यान वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संशयास्पद आणि दूरवरच्या हालचालींवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी अतिसंवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वॉच टॉवर उभारण्याच्या निर्णय अतिसंवेदनशील ठिकाणांवरील हालचाली टिपण्यासाठी घेण्यात आला आहे. यासाठी प्रस्ताव तयार केला जात असून अजून मंजूरी मिळालेली नाही. मंजूरी मिळाल्यानंतर या वॉच टॉवरच्या माध्यमातून हल्ला होणाऱ्या ठिकाणांवर सतत संशयास्पद हालचाली टिपणे शक्य होणार आहे.

धावत्या लोकलवर हल्ला झालेल्या घटना

द्रविता सिंग या तरुणीवर फेब्रुवारी २०१८ मध्ये मशिद येथे धावत्या लोकलमध्ये हातावर फटका मारून हल्ला झाला. या हल्लामुळे त्या लोकमधून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तर जून २०१९ मध्ये आशा पाटील यांच्या धावत्या लोकलमध्ये दारूच्या रिकामी बाटलीचा हल्ला करण्यात आला होता. मात्र या हल्लात आशा पाटील यांचा थोडक्यात डोळा बचावला.

- Advertisement -

या ठिकाणी उभारण्यात येणार वॉच टॉवर

सध्या सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी अतिसंवदेनशील स्थानकांदरम्यान तैनात करण्यात आले आहेत. मात्र यांच्याकडून मर्यादित भागापर्यंत नजर ठेवली जाते. यामुळे नवी ठिकाणे गुन्हेगारांकडून निर्माण होत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी वॉच टॉवरवर सशस्त्र कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी उच्च क्षमतेचे दिवे आणि दुर्बिण असं साहित्यही या वॉच टॉवरवर असणार आहे. वॉच टॉवर हे कल्याण-टिटवाळासह, पारसिक बोगदा आणि वडाळा-मानखुर्द परिसरात उभारण्यात येणार आहे.


हेही वाचा –  देशातील पहिले ‘इनोव्हेशन सेंटर’ मराठी शाळेत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -