९ ते ११ मार्चदरम्यान मुंबईतील ‘या’ भागांत १० टक्के पाणी कपात

BJP MLA yogesh sagar letter to Municipal Commissioner iqbalsingh chahal about Regarding equal water distribution in mumbai
मुंबई शहरासह उपनगरात लोकसंख्येनुसार समान पाणी वाटप करा, भाजप आमदाराचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईत काही भागात उद्यापासून दोन दिवसांसाठी १० टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) देण्यात आली आहे.

बीएमसीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असून उद्यापासून (९ मार्च) येत्या शनिवारपर्यंत (११ मार्च) शहरातील काही भागांत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस ठाणे मनपातर्फे कोपरी पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू असताना कामगारांच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनीस हानी पोहचली होती. या हानीनंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे बीएमसीच्या निर्दशनास आले. यामुळे गुरूवारी सकाळी १० वाजल्यापासून शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू राहणार असून या कालावधीत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये बीएमसीकडून १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी 2 आणि 3 मार्च रोजी देखील मुंबईतील काही भागात पाणीकपात करण्यात आली होती. यामध्ये भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर (पश्चिम), पवई, लाल बहादूर शास्त्री मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर येथे पाणी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या 9 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्चला सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात होणार आहे.

मुंबईतील कोणत्या भागात पाणी कपात?
मुंबई शहर
ए विभाग: बीपीटी व नौदल परिसर
बी विभाग: संपूर्ण परिसर
ई विभाग: संपूर्ण परिसर
एफ-दक्षिण विभाग: संपूर्ण परिसर
एफ-उत्तर विभाग: संपूर्ण परिसर

पूर्व उपनगरे
टी विभाग: मुलूंड पूर्व व पश्चिम
एस विभाग: भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व येथील परिसर
एन विभाग: विक्रोळी (पूर्व), घाटकोपर पूर्व व पश्चिम
एल विभाग: कुर्ला (पूर्व)
एम-पूर्व विभाग: संपूर्ण परिसर
एम-पश्चिम विभाग: संपूर्ण परिसर.