घरताज्या घडामोडीमुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १९.०८ टक्के वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १९.०८ टक्के वाढ

Subscribe

मुंबईतील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. तसेच, पाणीपुरवठा करणाऱ्या तालाव क्षेत्रातही दमादार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईतील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. तसेच, पाणीपुरवठा करणाऱ्या तालाव क्षेत्रातही दमादार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यानुसार, तलावांमधील पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Water level increased by 19 08 in lake who supply water to mumbai)

मुंबईला सात तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा (Water Supply) केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ तलावांमध्ये (lake) सध्या १९.०८ टक्के पाणीसाठा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

सात तलावांच्या माध्यमातून मुंबईला दर दिवशी ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या सातही धरणातील पाणीसाठा दोन लाख ७६ हजार दशलक्ष लीटरवर पोहोचला आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात तलावांमधील पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. जून महिन्यातही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा खालावला होता. मात्र, आता मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे तलावांमधील पाणीसाठा (Water Storage) १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा – परशुराम घाटानंतर आता पर्यायी मार्गावरही अवजड वाहनांना नो एन्ट्री, एसटी बसेसही बंद

मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पुरेसा पाणीसाठा जमा होत नाही तोपर्यंत पाणी कपात कायम राहणार आहे. परंतु, आता जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. शिवाय, गेले चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा वाढला आहे.


हेही वाचा – सपाचे आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -