घरताज्या घडामोडी'पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुर्नवापर करा' - जयंत पाटील

‘पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुर्नवापर करा’ – जयंत पाटील

Subscribe

'पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुर्नवापर करा', असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

‘जगभरात भारत, चीन, अमेरिका हे तीन देश सर्वाधिक पाण्याचा वापर करतात त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितका पाणी साठा उपलब्ध आहेत त्यातला ५०% साठा फक्त ७ देश वापरतात. त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील जनतेने पाण्याचा योग्य वापर करायला हवा. येत्या काळात महाराष्ट्र शासन वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार’, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला राज्याच्या जलसंपदा खात्याचे अधिकारी तसेच प्राधिकरणाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पाण्याचा सध्यस्थितीचा आढावा घेतला आणि त्यावर चर्चा देखील झाली त्यावेळी ते बोलत होते.

पाण्याचा पुर्नवापर करण्याची व्यवस्था करावी

मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमधील इमारतींमध्येही पाण्याचा पुर्नवापर करण्याची व्यवस्था करावी अशा सुचना विकासकांना दिल्या जातील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. येत्या काळात विकासकांना तशा सुचनाही द्या असेही ते म्हणाले. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी होऊन महाराष्ट्रातील पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

बाथरूम, टॉयलेट्समध्ये ठराविक क्षमतेचे शॉवर, फ्लश

ज्या प्रमाणे घरात ठराविक क्षमतेचे वीज उपकरणे वापरली जातात त्याचप्रमाणे राज्यात ठराविक क्षमतेचे जल उपक्रम आणता येतील का? जल उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उपकरणे बनतानाच तसे उपकरणे बनवण्याचे निर्देश द्या, असे निर्देश जयंत पाटील यांनी दिले आहे.

पाणी चोरीविरोधात कायदा यावा

विविध मार्गाने पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्रभरातून येत आहेत. पाणी चोरीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. येत्या काळात पाणी चोरीविरोधात कायदा आणण्याबाबत विचार व्हावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डोंबिवली प्रदूषण: हिरव्या पावसानंतर आता रस्ताही झाला गुलाबी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -