घरमुंबईजलवाहिनीचे काम; वांद्रे, सांताक्रूझ, बीकेसीत पाच दिवस कमी दाबाने पाणी

जलवाहिनीचे काम; वांद्रे, सांताक्रूझ, बीकेसीत पाच दिवस कमी दाबाने पाणी

Subscribe

मुंबई: सांताक्रुझ (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी स्‍मशानभूमी नजिकच्‍या १ हजार २०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचे पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचे काम मुंबई महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍यातर्फे हाती घेण्यात येणार आहे. तसेच, हंसबुर्गा रोड पुलाखालील वैतरणा जलवाहिनीवरील गळती दुरूस्‍तीचेही काम केले जाणार आहे. सदर कामांमुळे ४ ते ८ जून या कालावधीत एच / पूर्व विभागातील वांद्रे, सांताक्रूझ, बीकेसी आदी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
यासंदर्भातील माहिती पालिका जलअभियंता खात्यामार्फत देण्यात आली आहे.

तसेच, सदर कालावधीत नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून तो काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ४ जून ते ८ जून दरम्‍यान पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ (पूर्व) परिसरात जलवाहिनी दुरूस्‍तीची दोन प्रमुख कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे एच / पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

- Advertisement -

एच / पूर्व विभागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणारे विभाग

# ४ जून -: वांद्रे-कुर्ला संकुल येथील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते १०.४५ वाजेपर्यंत होईल.

# ५ जून -: संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

- Advertisement -

# ६ जून -: संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

# ५ जून ते ८ जून -: एच / पूर्व विभागातील भारत नगर, वाल्मिकी नगर, महाराष्‍ट्र नगर, वांद्रे -कुर्ला संकुल येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

गेल्या महिन्यात फुटली होती ६०० व्यासाची जलवाहिनी

वांद्रे (पश्चिम) येथील वॉटरफिल्ड रोड येथे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान  पालीहिल जलाशय येथील ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (इनलेट) अचानकपणे फुटली होती. शेर्ली राजन रोड, चिंबई गाव, वरोडा रोड, मॅन्युएल गोन्झाल्व्हिस रस्त्यालगतचा परिसर, पेरी रोड, नवीन कांतवाडी परिसरातील पाणीपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान प्रभावित झाला होता. त्यामुळे ‘एच’/पश्चिम विभागामधील काही भागांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. महापालिकेने तातडीने जलवाहिनी दुरूस्‍ती काम हाती घेतले. खारदांडा, कोळीवाडा, दांडपाडा आणि खारमधील १६ ते २१ क्रमांकाच्या रस्त्यावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -