घरताज्या घडामोडीमुंबईकरांच्या पाणीटंचाईची चिंता मिटली; पुरवठा करणारे सातही तलाव ओव्हर फ्लो

मुंबईकरांच्या पाणीटंचाईची चिंता मिटली; पुरवठा करणारे सातही तलाव ओव्हर फ्लो

Subscribe

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाणीटंचाईचा प्रश्व मिटणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. महापालिकेने नुकताच सातही तलांवांची पाहाणी केली असून, सातही तलाव भरल्याची माहिती दिली.

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाणीटंचाईचा प्रश्व मिटणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. महापालिकेने नुकताच सातही तलांवांची पाहाणी केली असून, सातही तलाव भरल्याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरा साठी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. (Water shortage worries of Mumbaikars solved All seven supply ponds overflowed)

मुंबईची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भविष्यात या 7 तलावांमधून होणारा पाणीपुरवठा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत.

- Advertisement -

मुंबईला दररोज पाणीपुरवठा

  • तानसा (455 द.ल.लि. प्रतिदिन)
  • मोडक सागर (वैतरणा) (455 द.ल.लि. प्रतिदिन)
  • मध्य वैतरणा (455 द.ल.लि. प्रतिदिन)
  • उर्ध्व वैतरणा (640 द.ल.लि. प्रतिदिन)
  • भातसा (2020 द.ल.लि. प्रतिदिन)
  • विहार (90 द.ल.लि. प्रतिदिन)
  • तुळशी (18 द.ल.लि. प्रतिदिन)

तलाव                   पाणीसाठा (दशलक्ष लीटर)         टक्केवारी

- Advertisement -

अप्पर वैतरणा                86,930                        38.29

भातसा                        33,32526                    46.47

मोडकसागर                  1,13,181                     87.79

मध्य वैतरणा                  91,457                        47.26

तानसा                        84,550                        58.28

विहार                         13,951                        50.37

तुळशी                        5,691                          70.73

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. मुंबई शहराला सात तलावातून पाणीपुरवठा होता. या तलावातील पाणीपातळीवरुन पाणी कपात की पाणीपुरवठा हे ठरले जाते.

मुंबईत मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या शिवाय, रस्त्यावर खड्डेही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे अनेकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा –  सणासुदीत ‘व्होकल फॉर लोकल’ व्हा, ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा चीनला शह

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -