घरताज्या घडामोडीWater Storage : मुंबईकरांवर किमान 10 ते 20 टक्के पाणी कपातीचे संकट

Water Storage : मुंबईकरांवर किमान 10 ते 20 टक्के पाणी कपातीचे संकट

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलावात सध्या २,४५,६७० दशलक्ष लिटर (१६.९७ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज या सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे,भिवंडी, निजामपूर महापालिका क्षेत्राला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा हा पुढील जेमतेम दोन महिने पुरेल इतका आहे.

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलावात सध्या २,४५,६७० दशलक्ष लिटर (१६.९७ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज या सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे,भिवंडी, निजामपूर महापालिका क्षेत्राला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा हा पुढील जेमतेम दोन महिने पुरेल इतका आहे. त्यातच जलवाहिनी फुटण्याच्या आणि कडक उन्हामुळे होणारे बाष्पीभवन पाहता सदर पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. तोपर्यंत पावसाळा नीटपणे सुरू न झाल्यास मुंबईकरांवर पाणी टंचाईचे भीषण संकट कोसळणार आहे. त्यासाठीच आतापासूनच पाणी बचत करून नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत आणि त्यातून तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होईपर्यंत तरी मुंबईकरांवर किमान १० % ते २०% इतकी पाणीकपात लादली जाण्याची दाट शक्यता आहे. (Water Storage at least 10 to 20 percent water cut crisis on Mumbaikars)

मंगळवारी मुंबई महापालिका पाणी खात्याची महत्वाची बैठक पाणी टंचाई बाबत होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत पाणी कपात किती व कधीपासून लागू करावी, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

गतवर्षी ६ मे रोजी सकाळपर्यंत सात तलावात मिळून ३,२७,४५७ दशलक्ष लिटर (२२.६२ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा सात तलावात मिळून एकूण २,४५,६७० दशलक्ष लिटर (१६.९७ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा पुढील दोन महिने म्हणजे जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. वास्तविक , गतवर्षी पेक्षाही यंदा सात तलावात मिळून ८१,७८७ दशलक्ष लिटर ( ५.६५ टक्के) इतका म्हणजे जवळजवळ मुंबईसह ठाणे, भिवंडी, निजामपूर महापालिका क्षेत्राला २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा कमी आहे.

यंदा पाऊस समाधानकारक पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून जरी वर्तविण्यात आलेली असली तरी हवामानाचा, पावसाचा लहरीपणा पाहता पाऊस कधी कधी जून महिन्यात कमी पडतो. तर कधी कधी जुलै महिना खाली जातो आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस बरा पडतो. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठयावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

- Advertisement -

परिणामी मुंबई महापालिकेला सात तलावात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडलेला पाऊस, त्यामुळे सात तलावात जमा झालेला पाणीसाठा, वर्षभरासाठी १ ऑक्टोबर रोजी पासून पुढील वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेला सात तलावातील जमा १४,४७, ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा पाहता त्याचे गणित करून पाणी कपातीबाबत आवश्यक तो निर्णय घेणे भाग पडते. तरच मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होतो. अन्यथा मुंबईला वर्षभर पाणी कपातीच्या संकटाला तोंड देणे भाग पडते.

तलावातील पाणीसाठा

तलाव पाणीसाठा टक्केवारी

अप्पर वैतरणा -: ३१,४३५ द.लि. १३.८५

मोडक सागर -: २७,५३६ द.लि. २१.३६

तानसा -: ४९,३४४ द.लि. ३४.०१

मध्या वैतरणा -: २१,९४८ द. लि. ११.३४

भातसा -: १,०४,२१० द.लि. १४.५३

विहार -: ८,३३१ द. लि. ३०.०८

तुळशी -: २,८६७. द. लि. ३५.६३
——————————————————–
सन २०२४ २,४५,६७० द.लि. १६.९७

सन २०२३ ३,२७,४५७ द.लि. २२.६२

गतवर्षीपेक्षा यंदा सात तलावात ८१,७८७ दशलक्ष लिटर (५.६५ टक्के) इतका पाणीसाठा कमी आहे.


हेही वाचा – Mumbai Metro : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका; नागपाडा ते गेट वे ऑफ इंडिया मेट्रो धावणार

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -