घरमुंबई४ ऑगस्ट रोजी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद; १५ टक्के पाणी कपात

४ ऑगस्ट रोजी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद; १५ टक्के पाणी कपात

Subscribe

मुंबई महापालिका पाणी खात्यामार्फत भांडूप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका पाणी खात्यामार्फत भांडूप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडूप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ या कालावधीत संपूर्ण मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागात पाणी पुरवठा बंद

- Advertisement -

भांडुप, एस विभाग : गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर, कांजूरमार्ग (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम), रमाबाई नगर १ आणि २, दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर, साई हिल, टेंभीपाडा, कांजूर (पश्चिम), विक्रोळी (पश्चिम), सुर्यानगर, विक्रोळी स्थानक लगतचा परिसर, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर, खिंडीपाडा, श्रीरामपाडा, राजारामवाडी, रामनगर, तानाजीवाडी, रमाबाई आंबेडकर नगर, टेंभीपाडा, नरदास नगर, शिवाजी नगर, साई हिल, साई विहार, धारावी, जी/उत्तर विभाग, आरे रोड, मोरारजी नगर, गौतम नगर, जयभीम नगर, फिल्टर पाडा, पठाणवाडी, कैलाश संकुल पंपिग स्टेशन येथून होणारा पुरवठा – वीर सावरकर मार्गालगतचा परिसर, विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी गाव, गोदरेज रुग्णालय विक्रोळी (पूर्व), सर्वोदय नगर क्षेत्र – सर्वोदय रुग्णालय ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर, विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी स्थानक ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर,

के/पूर्व विभाग : चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहिद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्गक्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर.

- Advertisement -

या भागात १५ टक्के पाणी कपात

पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रात पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात

एल विभाग : कुर्ला उत्तर क्षेत्र – बरेली मस्जिद, ९०’०” रोड, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर,साकी विहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्य नगर पाईपलाईन – (सकाळी ६ ते दुपारी १.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठयामध्ये १५ टक्के कपात व उंचावरील भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).

महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड – (पहाटे ५ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).


हेही वाचा – माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -