घाटकोपर, भांडुप परिसरात ३ मार्चला पाणी नाही; पण कारण काय?

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच, पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबईः मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पूर्व उपनगरामध्ये भांडुप (पश्चिम) एस विभागातील क्वारी रोड या ठिकाणी १२०० मिलीमीटर व ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या दुरुस्ती कामांमुळे २ मार्च रोजी रात्री १२ पासून ते ३ मार्च रात्री १२ या कालावधीत म्हणजे २४ तासांसाठी घाटकोपर व भांडूप परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच, पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

येथे पाणीपुरवठा बंद 

भांडूप विभाग -:
प्रताप नगर रस्ता लगतचा परिसर, कांबळे कंपाऊंड, जमील नगर, कोकण नगर, समर्थ नगर, मुथू कंपाऊंड, संत रोहिदास नगर, राजा कॉलनी, शिंदे मैदान, सोनापूर, शास्त्रीनगर, लेक मार्ग,सीएट टायर मार्ग,सुभाष नगर, आंबेवाडी, गावदेवी मार्ग, सर्वोदय नगर, भट्टीपाडा, जंगल मंगल मार्ग, भांडूप (पश्चिम), जनता बाजार (मार्केट), ईश्वर नगर, टॅंक मार्ग, राजदीप नगर, उषा नगर, व्हिलेज मार्ग, नरदास नगर, शिवाजी नगर, टेंभीपाडा, कौरी मार्ग लगतचा परिसर, कोंबडी गल्ली, फरीद नगर, महाराष्ट्र नगर, अमर कौर विद्यालय परिसर, काजू टेकडी, जैन मंदीर गल्ली, बुद्ध नगर, एकता पोलिस चौकी लगतचा परिसर, उत्कर्ष नगर, फुगेवाला कंपाऊंड, कासार कंपाऊंड, लाल बहादूर शास्त्री रस्त्यालगतचा परिसर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० वा.)

जुना हनुमान नगर, नवा हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी फुले नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री ३.४५ ते सकाळी १०.४५ वा.)

water supply stop ghatkopar bhandup for dayरमाबाई आंबेडकर नगर – १ आणि २, साई विहार, साई हिल – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ४.०० ते रात्री ११.०० वा.)

# लाल बहादूर शास्त्री मार्गा लगतचा मंगतराम पेट्रोल पंप पासून ते गुलाटी पेट्रोल पंप विक्रोळी पर्यंतचा परिसर, कांजूरमार्ग (पश्चिम) रेल्वे स्थानक लगतचा परिसर, नेव्हल कॉलनी, डॉकयार्ड कॉलनी, सूर्यानगर, चंदन नगर, सनसिटी, गांधी नगर आंबेवाडी, इस्लामपुरा मस्जिद, विक्रोळी स्थानक (पश्चिम) लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री लगतच्या औद्योगिक वसाहती, DGQA वसाहत, गोदरेज निवासी वसाहत, संतोषी माता नगर (टागोर नगर क्रमांक ५ – विक्रोळी पूर्व) – *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.०० ते रात्री ११.०० वा.)

घाटकोपर विभाग -:
लाल बहादूर शास्त्री मार्ग विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी पार्क साईट व लोअर डेपो, पाडा पंपिंग स्टेशन वरुन पाणी पुरवठा होणारे इतर विभाग – लोअर डेपो पाडा, अप्पर डेपो पाडा, सागर नगर, म्युनिसिपल बिल्डिंग झोन. – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० वा.)

वीर सावरकर मार्ग – *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.३० ते दुपारी १.३० वा.)

लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), वाधवा, कल्पतरू, दामोदर पार्क, साईनाथ नगर मार्ग, उद्यान गल्ली, संघानी इस्टेट – *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.०० ते रात्री ११.०० वा.)