मुंबई महापालिकेच्या ‘या’ भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबाने

महापालिकेच्या 11 विभागात दररोज सकाळी 11:00 वाजल्यापासून दुपारी 3:00 वाजेपर्यंत हे दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. म्हणजेच पुढील चार दिवस दिवसांतील 4 तासांकरिता 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

water supply

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) 11 भागात पाणीपुरवठा (water supply) कमी दाबाने होणार आहे. 24 मे ते 27 मे या कालावधीत महापालिकेच्या ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी या विभागातील काही परिसरामधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महानगरपालिकेडून पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 11 विभागात दररोज सकाळी 11:00 वाजल्यापासून दुपारी 3:00 वाजेपर्यंत हे दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. म्हणजेच पुढील चार दिवस दिवसांतील 4 तासांकरिता 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

या दुरूस्तीच्या कामामुळे 5 टक्के पाणी कपात मुंबईत करण्यात येणार आहे. तर याच भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद होण्याची सुद्धा शक्यता महानगरपालिकेने वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर या पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या काही भागात येत्या मंगळवार 24 मे रोजी पाणीपुरवठा (water supply) बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईतील मोरबे धरण (Morabe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी (Digha main aqueduct) आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, बुधवारीही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


हेही वाचा – दहा वर्षीय मुंबईकर रिदमची ‘एव्हरेस्ट’वर चढाई, केला ‘हा’ विक्रम