घरताज्या घडामोडीदादर, प्रभादेवी, माहीम विभागात 'या' दिवशी होणार पाणीपुरवठा बंद

दादर, प्रभादेवी, माहीम विभागात ‘या’ दिवशी होणार पाणीपुरवठा बंद

Subscribe

नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा खात्यातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यामार्फत तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २ व ३ डिसेंबर रोजी दादर, प्रभादेवी, माहीम विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर सातरस्ता, धोबीघाट आदी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा खात्यातर्फे करण्यात आले आहे. महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १,४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम करणार आहेत. हे काम २ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होऊन ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

- Advertisement -

या परिसरात होणार नाही पाणीपुरठा

  • जी/ दक्षिण विभाग
    २ डिसेंबर रोजी डिलाईल रोड परिसरात दुपारी २ ते ३ वाजता पाणीपुरठा होणार नाही. तर सिटी सप्लाय भागात दुपारी ३.३० ते सायं. ७ दरम्यान पाणीपुरवठा बंद राहिल. ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ), या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
  • जी /उत्तर
    २ डिसेंबर रोजी सायं. ४ ते ७ आणि सायं. ७ ते रात्री १० या कालावधीत, एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही
  • जी / दक्षिण
    ३ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ (डिलाईल रोड) कालावधीत ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग आदी परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

या परिसरात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

  • जी /दक्षिण
    ३ डिसेंबर रोजी पहाटे ४ ते सकाळपर्यत धोबी घाट, सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरठा करण्यात येईल.

हेही वाचा – ठाकरे सरकार वर्षपूर्ती : उद्धव ठाकरे सपशेल फेल – अविनाश जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -