घरमुंबईठाण्यात काही भागांमध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

ठाण्यात काही भागांमध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

Subscribe

कोस, डायघर, देसाई इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे, फायर ब्रिगेड, बाळकूम पाडा क्र.१ या भागांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र औदयोगिक महामंडळाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार, २५ ऑक्टोंबर २०१८ पासून पुढे दर ७ दिवसांनी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २५ ऑक्टोबरला कोस, डायघर, देसाई इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे, फायर ब्रिगेड, बाळकूम पाडा क्र.१ इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.


हेही वाचा – अमेरिकेत खळबळ! बिल क्लिंटन, ओबामांच्या हत्येचा कट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -