घरमुंबईठाणेकरांना दिलासा पाणी दरवाढ फेटाळली

ठाणेकरांना दिलासा पाणी दरवाढ फेटाळली

Subscribe

अंदाजपत्रकात ३०६ कोटीची वाढ

ठाणे महापालिकेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात पाणी दरवाढ प्रस्तावीत करण्यात आली होती. मात्र शुक्रवारच्या स्थायी समितीने प्रशासनाकडून सुचविण्यात आलेली दरवाढ अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी दरवाढीतून दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ३०६ कोटीची वाढ केल्याने हे अंदाजपत्रक ४०८६ कोटीवर पोहचले आहे. त्यामुळे अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीकडून महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिरवर यांनी २०१९- २० सुधारीत व २०२०-२१ चे ३७८० केाटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकात मालमत्ता करात कोणतीही वाढ सुचविण्यात आली नव्हती, मात्र पाणी बिलात तब्बल ४० ते ५० टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली हेाती. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी टेलिस्कोप दराने पाण्याचा आकार ठेवावा लागणार असल्याने व मागील पाच वर्षात पाणी दरवाढ केली नसल्याच्या कारणाने प्रशासनाकडून ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती.

- Advertisement -

या दरवाढीमध्ये झोपडपट्टी, बैठ्या चाळी यांना पुर्वीच्या १३० रूपये प्रति कुटूंब प्रतिमाह ऐवजी रु. २०० रूपये प्रति कुटूंब प्रति माह तसेच इमारतीमधील सदनिका धारकांनाही २५० चौरस फूटात शंभर रूपयांपासून ते ३ हजार चौरस फूटापर्यंत अडीचशे रूपयांपर्यंत तर व्यावसायिक पाणी पुरवठ्यासाठी प्रति हजार लीटरसाठी रु. १५ ते ४० रूपये असलेले दर रु.३० ते ६० रूपये अशी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती.

दरवाढीमुळे ठाणेकरांची पाणी महागणार असल्याने सर्वच स्थरातून नाराजी व्यक्ती करण्यात आली होती. सर्वसामान्य ठाणेकरांकडून सामाजिक संस्थांकडूनही पाणी दरवाढीस विरोध दर्शविण्यात आला होता. अखेर शुक्रवारच्या स्थायी समितीने ही पाणी दरवाढ फेटाळली आहे. प्रशासनाच्या अंदाजपत्रकात ४९.३० लक्ष अखेरच्या शिल्लकेसह १८४२ ११ कोटी महसुली व १९३७.४० कोटी भांडवली खर्च असा एकूण ३७८० केाटी रकमेचे खर्चाचे अंदाजपत्रक प्रशासनाच्यावतीने प्रशासनास सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी चर्चा करून त्यात ३०६ कोटी वाढ केली आहे. यामध्ये मालमत्ता कर, शहर विकास, जाहीरात, स्थावर मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कराच्या थकबाकीपोटी वसुलीची रक्कम अपेक्षित करून जमेत वाढ करण्यात आली आहे. अंतिम मंजुरीसाठी हे अंदाजपत्रका स्थायी समितीकडून महासभेत मांडण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -