घरमुंबई'WE CONNECT- मराठी उद्योजक' - एक दिवसीय सेमिनार

‘WE CONNECT- मराठी उद्योजक’ – एक दिवसीय सेमिनार

Subscribe

मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ आणि 'एस. पी. मंडळी'ज वुई स्कूल वेलिंगकर एज्युकेशन' यांच्यावतीने रविवारी मराठी उद्योजक' या एकदिवसीय बिझिनेस सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ आणि ‘एस. पी. मंडळी’ज वुई स्कूल वेलिंगकर एज्युकेशन’ यांच्यावतीने रविवार, ९ डिसेंबर २०१८ रोजी ‘WE CONNECT – मराठी उद्योजक’ या एकदिवसीय बिझिनेस सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. बिझनेस कॉन्फरन्स सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘एस. पी. मंडळी’ज वुई स्कुल वेलिंगकर एज्युकेशन, माटुंगा सेंट्रल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबत मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्या कार्यवाह दीपा मंत्री म्हणाल्या की, होतकरू मराठी तरुण-तरुणींना उद्योजकतेचे महत्व पटवून देण्यासाठी, तसेच नवउद्योजकांना काळानुसार उद्योजकतेमध्ये होणारे बदल, उत्पादनक्षमता कशी वाढवावी तसेच आपल्या उत्पादनांचा दर्जा कसा राखावा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय बिझिनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी व्यावसायिक उद्योजकांसाठी सेमिनार

दीपा मंत्री पुढे म्हणाल्या की, कार्यक्रमाचे आयोजक मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ यांच्यातर्फे मराठी तरुण तरुणींना व्यवसाय मिळवून देण्यासाठी, तसेच मराठी व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी, व्यापारवृद्धीसाठी त्यांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. नवोदितांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी या हेतूने १९८९ पासून मंडळातर्फे दादर येथे महाराष्ट्र व्यापारी पेठ केली जाते. तसेच ही पेठ फक्त दादर विभागापुरता मर्यादित न ठेवता गेल्या काही वर्षांपासून बोरिवली, ठाणे, दहिसर, विरार याठिकाणी देखील मराठी व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर सरकारी धोरणे, योजना, कर प्रणाली, बजेट या विषयांवर मार्गदर्शन शिबिरेही मंडळातर्फे राबवली जातात.

- Advertisement -

विविध उद्योजकांचे मार्गदर्शन 

कार्यक्रमामध्ये उपस्थितांना डॉ. उदय साळुंखे, नितीन पोतदार, डॉ. एस. टी. गोंधळेकर, डॉ. अविनाश फडके, डॉ. शैलेश काळे, दिलीप शेवडे, शैलेश पाटील, अजय वाळिंबे यांसारख्या दिग्गज वक्त्यांचे मार्गदर्शन असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्या अध्यक्षा अचलाताई जोशी भूषविणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -