अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव आम्ही केली आहे – धनंजय महाडिक

We have arranged for an additional 10 votes for the Rajya Sabha elections, said Dhananjay Mahadik.
अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव आम्ही केली आहे - धनंजय महाडिक

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मते फुटतील, असा दावा भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी 42 मतांची गरज आहे. या पैकी सुमारे 32 मते भाजपकडे आहेत. अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव आम्ही केली असल्याचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले. राज्यसभआ निडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

महाविकास आघाडीचे आमदार नाराज – 

महाविकास आघाडीवर अनके आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भाजपला (bjp) मतदान करतील. भाजपकडे स्वत:ची 30 ते 32 मत आहेत. कोटा पंद्धतीने पसंतीची मत द्यायची आहेत. अशा प्रकारच्या निवडणूकीमध्ये भाजपचा हातखंडा आहे. तिसरी जागा भाजपचीच होती. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशांध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिरिक्त 10 मतांची बेगमी केली आहे, असे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले.

सहाव्या जागेसाठी भाजपचा प्लॅन – 

भाजपने तिसऱ्या जागेसाठी रविवारी रात्री धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे नाव झाहीर केले आहे. मात्र, भाजपकडे फक्त 22 मत आहेत. अपक्षांची मदत घेतली तरी भाजप 32 मतापर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळे भाजपची ही जागा कशी निवडून येणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील सगळ्यांना पडला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूच भाष्य केले. आम्ही राज्यसभा निवडुकीसाठी तिसरा उमेदवार दिला आहे. म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून अणणार याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. मात्र, त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले