घरमुंबईभ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई आणि ठाण्यातील काही दहीहंडी सोहळ्यांना भेटी दिल्या.

दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणाऱ्या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा, आम्ही अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी फोडू. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील स्वामी प्रतिष्ठानच्या भव्य दहीहंडीस आज दुपारी त्यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर जय जवानच्या पथकाने नऊ थर लावून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली.

यावेळी स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच त्यांच्या प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंगळे यांचाही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसनीय कामगिरीबद्दल शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपये आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी २ लाख रुपये, असे ७ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा – मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने फोडली पापाची हंडी

राज्यात विकासाची दहीहंडी फोडू

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवालाही भेट दिली होती. “दहीहंडीच्या थराप्रमाणे बलवान गोविंदा खालच्या थराला तर कमजोर गोविंदा वरच्या थराला आधार देतात. त्याप्रमाणेच राज्यातील कमजोर वर्गाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्यात विकासाची दहीहंडी फोडून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविणार”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची गोविंदा पथकांना प्रेरणा दिली.

CM Devendra Fadnavis Ghatkopar Dahihandi Festial 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -