घरमुंबईलवकरच सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास होणार सुरू - सुरेश काकाणी

लवकरच सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास होणार सुरू – सुरेश काकाणी

Subscribe

कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू होणार

कायम धावत असणार मुंबईची ‘लाइफ लाइन’ अर्थात मुंबई लोकल कोरोना काळात दीर्घ कालावधीसाठी ठप्प होती. कालांतराने काही ठराविक वेळेत आणि अत्यावश्यक लोकांसाठी ती सुरू देखील झाली. मात्र आता सर्वसामान्य मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुंबईकरांची लोकलसेवा पुन्हा सुरळीत होण्याची. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची चित्र दिसतंय. मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सुरेश काकाणी म्हणाले, सध्या ब्रिटन आणि युकेतून आलेल्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनचा आढावा घेतला जातोय. ब्रिटनमधील विमान सेवा सुरू झाली असून, रुग्ण संख्या आणखी वाढतेय का, याचा १५ दिवस आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेने हा आढावा घेतल्यावर राज्य सरकारला अहवाल दिला जाईल, त्यानंतर शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

यापूर्वी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, ”लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. लवकरच मुंबई लोकल सुरू करण्यावर निर्णय होईल”. विशेष म्हणजे केंद्र सरकारही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.

दरम्यान, कोरोना नियंत्रणात असला तरी सध्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आणि सरकारने मंजुरी दिलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. सर्वसामान्य नागरिक अद्याप लोकलने प्रवास करू शकत नाही आहे. त्याचप्रमाणे महिलांना ठराविक कालावधीसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -